2023 वर्षातील शेवटचा महिना ‘या’ लोकांना करणार धनवान |

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Monthly Horoscope December 2023 : या 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, सूर्य, बुध, शुक्र आणि गुरू ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून आले आहेत. हे योग काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. तुमच्यासाठी डिसेंबर महिना कसा असणार आहे जाणून घ्या डिसेंबर महिन्याचे राशीभविष्य

मेष (December 2023 Aries horoscope) 

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभदायक ठरणार आहे. तुम्हाला या महिन्यात कामात अपेक्षित यश मिळणार आहे. तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. आर्थिक लाभासह प्रगती होणार आहे. सर्व कामं बुद्धिमत्तेने, सद्दसदविवेकबुद्धीने आणि गोड पाणीने पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून कमिशन, कंत्राटी कामगार आणि सल्लागारांसाठी हा काळ अतिशय लाभदायक असणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे प्रत्येक क्षणाला संधी मिळणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी लाभणार आहे. या काळात तीर्थयात्रा जाण्याचे योग आहेत. जे लोक परदेशात करिअर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होणार आहे. या काळात तुम्ही कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होणार आहे. लव्हलाइफमध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे.

वृषभ (December 2023 Taurus horoscope) 

या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना संमिश्र असणार आहे. पैसे, आरोग्य आणि वेळेचे काळजीपूर्वक नियोजन तुमच्यासाठी हिताचं ठरेल. बदलत्या हवामानामुळे आजाराचा सामना करावा लागणार आहे. जुनाट आजार तुम्हाला शारीरिक आणा मानसिक त्रासदायक ठरणार आहे. त्रासामुळे तुम्हाला नैराश्य गाठणार आहे. या काळात तुम्हाला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. व्यवसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक आणि सल्ला घेऊन निर्णय घ्या. नोकरदारांनी आपलं काम स्वत:च करा. कोणतेही कामात घाई आणि निष्काळजीपणा करु नका. गाडी काळजीपूर्वक चालवा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळले. नात्याकडे दुर्लक्ष करु नका. दांपत्य जीवन सुखी होण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्या हिताचं ठरेल.

मिथुन (December 2023 Gemini horoscope)

या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना संमिश्र असणारा आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला घराबाहेरी लोकांची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खूष असणार आहे. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना चांगला असणार आहे. व्यवसायिकांसाठी हा महिन्या शुभदायक ठरणार आहे. या काळात नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरु करु शकता. कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचे योग आहेत. महिन्याचा मध्यभाग तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींना येऊ शकता. विरोधक तुमच्या कृतीत अडथळा आणण्याचा प्रयत्नात असेल. या महिन्यात प्रेमसंबंधात कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. अन्यथा वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे.

कर्क (December 2023 Cancer horoscope)   

डिसेंबर महिना हा या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यातील अडथळे दूर होणार आहेत. नोकरदार लोकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी बॉसचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुम्हाला दिली जाणार आहे. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा अडचणीत सापडाल. या महिन्यात अचानक कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत ठरणार आहे. मात्र प्रवासात तब्येत आणि वस्तूची काळजी घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरदारांना प्रमोशन होणार आहे. व्यवसायिकांसाठी हा महिन्यात व्यवसाय वाढीसाठी उत्तम आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी लढावं लागणार आहे. जोडीदाराशी प्रमाणिक राहा अन्यथा, नातं संपुष्टात येऊ शकतं. एक्स्ट्रा अफेअर्ससारख्या समस्याही वैवाहिक जीवनात वादळ आणू शकतात. 

सिंह (December 2023 Leo horoscope) 

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना शुभ आणि अनेक लाभाने भरलेला आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नोकरदारांना त्यांचा कामाचा चांगला मोबदला मिळणार आहे. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना उच्च पदे किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मानही द्विगुणीत होणार आहे. व्यापारी व्यक्तींसाठी महिन्याचा दुसरा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या काळात त्यांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणार आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलदायी ठरतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिन्या प्रगतीची आहे. या काळात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ होतील. तर विवाहितांच्या घरी नवीन पाहुण्याची चाहुल लागणार आहे. तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असू शकेल. याकाळात तुमची दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीची काळजी घ्या. प्रेम संबंधांच्या दृष्टीने डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे. लव्ह पार्टनरबरोबर खूप चांगले आनंदी वेळ घालविणार आहात. दांपत्य जीवनात आनंदच आनंद असेल. 

कन्या (December 2023 Virgo horoscope)  

या राशीसाठी वर्षाचा शेवटचा महिना यश, प्रगती आणि लाभ घेऊन आला आहे. डिसेंबर महिन्यात नशीबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमची अनेक स्वप्न पूर्ण होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात. घरात आणि बाहेर तुमचा मान-सन्मानात वाढ होणार आहे. लोक तुमच्या कामाचं आणि घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करणार आहेत. ज्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढ होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत ही डिसेंबर महिना सकारात्मक असेल. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. तुमचं कुठलं न्यायालयीन प्रकरण असेल तर ते मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येणार आहे. या महिन्यात मात्र रागावर थोडे नियंत्रण ठेवा, शब्द जपून वापरा अन्यथा होणारं कामही होणार नाही. सिंगल लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. प्रेम जीवनात आनंद असेल तर वैवाहिक जीवनात सुख समाधान असेल.

Related posts