Dawood Ibrahim Heakth Update Mumbai Police Source Confirm Dawood Ibrahim Was Hospitalized In Last Wekk Karachi Pakistan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dawood Ibrahim Updates :  फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दाऊदच्या प्रकृती बाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनीदेखील (Mumbai Police) आपली सूत्रे हलवली. मुंबई पोलिसांना दाऊदच्या प्रकृतीबाबत (Dawood Ibrahim Health Updates) मोठी अपडेट मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. 

1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा (Mumbai Serial Blast) मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील (Karachi) एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. पाकिस्तानी माध्यमांमध्येही दाऊदच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. दाऊदच्या प्रकृतीबाबत मुंबई पोलिसांनीदेखील आपल्या सूत्रांकडून माहिती घेण्यासाठी तातडीने हालचाली केल्या. 

मुंबई पोलिसांनी काय माहिती दिली?

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. दाऊद इब्राहिमवर हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली. दाऊद हा आजारपणामुळे रुग्णालयात दाखल नव्हता. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. 

जावेद मियांदादने काय म्हटले?

दाऊदच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे ‘एबीपी न्यूज’ने दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादसोबत संवाद साधला. 

जावेद मियांदादच्या मुलाने  दाऊद इब्राहिमच्या मुलीसोबत विवाह केला आहे. 2005 मध्ये झालेल्या या विवाहाची चर्चा भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यावेळी दाऊदचा फोटो समोर आला नव्हता. दाऊद इब्राहिम हा शेवटची घटका मोजत असून पाकिस्तान सरकारने हे वृत्त दाबले असल्याची चर्चा सुरू होती. पाकिस्तान सरकारने जावेद मियांदाद यालाही नजरकैदेत ठेवले असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, एबीपी न्यूजसोबत बोलताना जावेद मियांदाद याने या वृ्त्ताचे खंडन केले आहे. आपल्याला कोणीही नजरकैदैत ठेवले नसल्याचे त्याने म्हटले आहे. जावेद मियांदादने दाऊदच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. जावेद मियांदादने एबीपी न्यूजला सांगितले की, दाऊद इब्राहिमवर मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर मी काहीही बोलणार नाही. दाऊदवर जे काही बोलायचे ते पाकिस्तान सरकार सांगेल, असेही त्याने स्पष्ट केले.

[ad_2]

Related posts