हा तर निसर्गाचा चमत्कार! दोन हिश्शात विभागले गेले आकाश, सूर्यास्त होत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video Of Split Screen Sunset: सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य-अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला तो सोनेरी रंग मन मोहून टाकतो. अवकाशात पसरलेल्या या सोनेरी रंगाच्या छटा खूपच सुंदर दिसतात. पण एकाचवेळी आकाशात सूर्य अस्ताला जाताना पसरलेला सोनरी रंग आणि निरभ्र निळे आकाश असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहेत का. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या दृश्याला स्प्लिट स्क्रीन सूर्यास्त (Split-Screen Sunset) असं म्हटलं जातं. अलीकडेच फ्लोरिडामध्ये हे दृश्य दिसलं आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Rainmaker1973 या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात आकाश दोन हिश्शात विभागले गेल्याचे दिसत आहे. एका ठिकाणी सूर्य अस्ताला जात असल्याचे दिसत आहे तर एकीकडे सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला असून आकाश पूर्ण निळे झाले आहे व रात्र दिसत आहे. खरं तर आकाश आपल्याला असे विभागता येत नाही पण या व्हिडिओत तुम्ही सरळसरळ पाहू शकता की आकाशात दोन वेगळेच दृष्य दिसत आहेत. हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणून शकता. 

आत्ता तुम्ही विचार कराल की हे कसं घडलं? तर याचे उत्तर ढगांमध्ये लपलं आहे. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आकाशातील उजव्या बाजूच्या भागातील ढग आकाशात खूप उंचावर असतात. त्यामुळं अजूनही ते सूर्याची काही किरणे ग्रहण करु शकतात. तर, याच वेळी काही ढग खाली येतात. जे सूर्याची किरणे पूर्णपणे रोखतात. ढगांचा एक खोल थर तयार होतो आणि तो पूर्णपणे गडद दिसतो. प्रकाश आणि सावलीचे हे विरोधाभासी दृश्य आकाशात दिसते. 

आकाशातील एक भाग लख्ख सोनेरी रंगात चमकताना दिसत आहे. यात नारंगी, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा मिलाफ घडून आला आहे. तर, दुसऱ्या भागात अगदी त्याच्या विरोधात जांभळा व निळा रंग दिसतोय. हे रहस्यमयी दृश्य पाहून अनेकजण विचारात पडले आहेत. फ्लोरिडाच्या या घटनेने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केले आहे. स्प्लिट-स्क्रीन सूर्यास्ताचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

लोकांना ही घटना अद्भूत वाटत असली तरी यामागे एक वैज्ञानिक कारण लपले आहे. योग्य वातावरणीय परिस्थिती दिल्यास, स्प्लिट-स्क्रीन सूर्यास्त जगात कुठेही होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सूर्यास्त प्रत्यक्ष पाहाल तेव्हा प्रकाश आणि सावलीच्या या विरोधीभासाची नोंद घ्या. 

Related posts