Swiggy Order: Ordered Chicken From Swiggy And A Piece Of Metal Came Out In The Piece Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Swiggy Order : सध्या ऑनलाईनचे युग आहे. कपडे, वस्तू खरेदी बरोबरच आपण खाण्याचे पदार्थही ऑनलाईन पद्धतीने मागवत असतो. शिवाय, काही कंपन्या ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर (Online Shopping) दिल्यानंतर ताबडतोब खाण्याचे पदार्थ आपल्या पत्त्यावर पोहोचवतात. त्यांच्याकडे स्वच्छताही असते. त्यामुळे आपला कल ऑनलाईन अन्न पदार्थ मागण्याकडे वाढला आहे. मात्र, बंगळुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीने स्वीगीकडून (Swiggy)  चिकन मागवले असता त्यातून धातूचा तुकडा निघाला आहे. त्यामुळे तरुण चांगलाच हैराण झाला होता. त्याने स्वीगीला याबाबत जाब विचारला आहे. 

बंगळुरमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर स्वीकारणाऱ्या स्वीगी (Swiggy) या कंपनीकडून चिकन मागवले. मात्र चिकन (chicken shawarma) खाताना तो चांगलाच हैराण झाला. त्याच्या खाण्यात चिकनच्या हाडाऐवजी धातूचा तुकडा निघाल्याने तो चांगलाच हैराण झाला. त्यानंतर या व्यक्तीने संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान चिकनमध्ये धातूचा तुकडा निघाल्यामुळे चिडलेल्या व्यक्तीने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. बघताबघता हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

चिकनमध्ये निघाला धातूचा तुकडा 

स्वीगीकडून (Swiggy) पीडीत झालेल्या व्यक्तीने धातूचा तुकडा निघालेल्या चिकनचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media)  शेअर केला आहे. Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा प्रकार त्याने सांगितला आहे. त्याने याबाबत लिहिले की, “मी बंगळुरुच्या नागवाडा भागातून स्वीगीकडून चिकन शारवामा मागवले होते. मी चिकन खायला सुरुवात केली तेव्हा मला काहीतरी जड लागले. त्यानंतर मी निरखून पाहिले असता. त्यातून मेटलचा तुकडा बाहेर आला. त्यामुळे मी हैराण झालो. त्यानंतर मी स्वीगीकडे याबाबतची माहिती दिली. “

स्वीगीला तरुणाचे सवाल

तरुणाने स्वीगीच्या (Swiggy) व्यवस्थापनाला काही सवाल केले आहेत. तो म्हणाला, हा मेटलचा तुकडा माझ्या घशात अडकला असता. यामुळे माझा जीवही गेला असता. तुम्ही याचे गांभीर्य समजून घेणार आहात का? तुम्ही कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करणार आहात का? असे अनेक सवाल संबंधित तरुणाने केले आहेत. दरम्यान तक्रारदाराने चिकनचे (chicken shawarma) पैसे रिफंड करण्याची आणि दुसरी ऑर्डर आणून देण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, स्वीगीने याबाबत काय उत्तर दिले? याबाबतची माहिती तरुणाने दिलेले नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Child Pornography : चाईल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे, पाहणे गुन्हा ठरतो का? मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

[ad_2]

Related posts