( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ram Pran Pratishtha) करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं.
ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या (Ayodhya) राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी बाल रामाची मूर्ती अख्ख्या जगानं पाहिली. रामलल्लाला हिरेजडित मुकूट घालण्यात आलंय…कपाळी टिळा, हातात धनुष्यबाण, आभूषणांनी सजवण्यात आलंय. चेहऱ्यावर स्मित हास्य, कमलनयन, कानात कुंडलं, गळ्यात रत्नजडित हार घालण्यात आलाय…यामुळेच रामल्लाची मूर्ती सुंदर, मनमोहक, तेजस्वी रुपात दिसतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली… विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं. रामलल्लाला आता तंबूत राहावं लागणार नाही, अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अयोध्यावासियांनी शेकडो वर्ष विरह सहन केला असं सांगत त्यांनी अयोध्यावासियांचंही कौतुक केलं. 22 जानेवारी ही तारीख नाही तर कालचक्राचा उगम आहे असंही मोदींनी म्हंटलंय.
सीएम शिंदेंनी ढोल वाजत केला आनंद
अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सहकाऱ्यांसोबत एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय श्रीरामचा जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून शिंदेंनी शिवसैनिकांसोबत आपला आनंद साजरा केला..
देवेंद्र फडणवीस नागपूरात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातल्या रामनगर इथल्या राममंदीर परिसरातून अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहीला. श्रीरामाच्या मूर्तीवरचा पडदा दूर होताच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया खुपच बोलकी होती. मूर्ती अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी उपस्थितांसमोर बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत.. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतल्या राम मंदिरात करण्यात आली.. मूर्ती स्थापनेनंतर राम दर्शनाची ओढ आहे. ही ओढ फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याचं फडणीस म्हणालेत. त्यामुळे येत्या फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीराम पालखीमध्ये सहभाग घेतला. डीजेच्या तालावर ठेका धरत गुलाबरावांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद लुटला. देशभरात सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्याचे मंत्री देखील या उत्सवात सहभागी झाले.
रामभक्तांच्या राहण्याची सोय
अयोध्येत जाणा-या रामभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे राहण्याची सोय केली जाईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलीय.. राज्य सरकार लवकरच अयोध्येत धर्मशाळा आणि भक्त निवास बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं… अयोध्येतील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नार्वेकरांनी कुलाब्यातील राममंदिरात साजरा केला. यावेळी ते रामभजनांमध्ये तल्लीन झाले होते. लवकरच आपण रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.