Increase in the death rate of diabetic patients after Corona Shocking revelation from research

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. 

याचं एक कारण कोरोना महामारीशी संबंधित देखील असू शकते. या अहवालानुसार, सर्वात भीतीदायक बाब म्हणजे तरुण आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. द लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्राइनोलॉजी या सायन्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. 

डायबेटीजच्या रूग्णांची दृष्टी होतेय कमी

कोरोना महामारीच्या आधी आणि दरम्यान मधुमेहाच्या रुग्णांच्या डेटाची तुलना करणाऱ्या अभ्यासाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये असं आढळून आलंय की, कोरोनाच्या व्हायरसनंतर मधुमेही रुग्णांमध्ये दृष्टी कमी होण्याची समस्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य म्हणजे याचा सर्वाधिक फटका तरूण मुलं आणि महिला यांना झाल्याचं दिसून आलं.

जगभरात झालेल्या अभ्यासांची केली पडताळणी

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या शास्त्रज्ञांच्या टीमने जगभरातील 138 अभ्यासांची पडताळणी केली. यापैकी 39 अभ्यास उत्तर अमेरिकेशी संबंधित होते. यापैकी काही पश्चिम युरोपशी, 17 अभ्यास आशियाशी आणि इतर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर प्रदेशांशी संबंधित होते. या सर्व अभ्यासांची पडताळणी केल्यानंतर मधुमेहाच्या रूग्णांवर महामारी-संबंधित व्यत्ययांचा प्रभाव तपासला गेला.

लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढली समस्या

संशोधकांना यामध्ये असं दिसून आलं की, कोरोनाच्या महामारीनंतर लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्येही मधुमेहाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. जगभरातील चिकित्सा आयसीयूमध्ये मधुमेहाशी संबंधित रुग्णांची संख्या धक्कादायक आहे. मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबेटिक केटोॲसिडोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं, या अहवालात दिसून आलं आहे.

Related posts