( प्रगत भारत । pragatbharat.com)
Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एका कंपनीने ही ऑफर आणली आहे.
अनेकांना आपलं फोनचं व्यसन सोडायचं असतं. ही ऑफर स्वीकारलात तर तुम्हाला फोनटं व्यसन सोडण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला केवळ एका महिन्यासाठी तुमचा फोन दूर ठेवायचा आहे. असे करुन दाखवलात तर अमेरिकन दही कंपनी तुम्हाला 8.3 लाख रुपये देणार आहे.
Siggi’s असे या अमेरिकन कंपनीचे नाव आहे. या कंपनीने लोकांसाठी ‘डिजिटल डिटॉक्स चॅलेंज’ आणले आहे. हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर तुम्हाला 30 दिवस फोनला अलविदा करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला डिजिटल डिजिटल डिटॉक्स होण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर मोबाईल सोडल्याने तुमच्या जीवनावर काय सकारात्मक परिणाम होईल? हे स्पष्ट करणारा निबंध लिहावा लागणार आहे.
An American yogurt company offers to pay $10,000 (8.3 lakhs) for people who give up their phone for a month. Selection of participants will be based on the essay explaining why they need digital detox. pic.twitter.com/zQA7rzt1QU
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) January 28, 2024
अर्जाची शेवटची तारीख
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. निवडलेल्या सहभागींना त्यांचे फोन सीलबंद लॉकरमध्ये जमा करावे लागतील. तसेच संपूर्ण महिनाभर संबंधित इसमाने कोणतेही डिजिटल उपकरण वापरता येणार नाही, हे लक्षात असूद्या. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. स्पर्धेचा नियम मोडलेल्या स्पर्धकास बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.
कॅश आणि बरंच काही
हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या विजेत्याला केवळ 10 हजार डॉलरचे रोख बक्षीस मिळणार आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धकाला स्मार्टफोन लॉक, जुना फ्लिप फोन, एक महिन्याचे प्रीपेड सिम कार्ड आणि तीन महिन्यांचे रिफ्रेशिंग सिग्गीज योगर्टचे खास गिफ्ट मिळणार आहे. जगभरातून या स्पर्धेला तूफान प्रतिसाद मिळत आहे.
कोण होणार विजेता?
तर तुम्ही डिजिटल जगापासून दूर जाण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला यासाठी एक अर्ज लिहावा लागेल. Siggies चे आव्हान स्वीकारुन तुम्ही पुढील 8.3 लाख रुपयांचे मालक होऊ शकता! हे आव्हान कोण स्वीकारणार आणि कोण विजेते होणार? हे पुढच्या महिन्यात कळू शकेल.