British Punjabi doctor Tony Dhillon leads ground breaking international trial of bowel cancer vaccine Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cancer Vaccine: कॅन्सरसारख्या (Cancer) जीवघेण्या आजाराशी अवघं जग झुंज देतंय. अद्याप कॅन्सरवर ठोस उपाय किंवा उपचार आलेला नाही. जगभरातील वैज्ञानिक, डॉक्टर्स कॅन्सरसारख्या भयावह रोगावर उपचार शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशातच कॅन्सरविरोधातील (Cancer Updates) लढाईत एक आशेचा किरण समोर आला आहे. ब्रिटनमधील (Britain) भारतीय वंशाचे प्रख्यात डॉक्टर टोनी ढिल्लन (Doctor Tony Dhillon) यांनी आतड्याच्या कर्करोगाच्या उपचारावर प्रभावी लस शोधून काढली आहे. डॉक्टर टोनी ढिल्लन यांच्या यशस्वी संशोधनामुळे आतड्यांसंबंधी कर्करोगाच्या (Bowel Cancer) उपचारात नक्कीच फायदा होणार आहे. डॉक्टर ढिल्लन यांचं काम केवळ वैद्यकीय जगतात महत्त्वाचं ठरणार नाही, तर जीवघेण्या आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठीही अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आतड्यांसंबंधी कर्करोगावरील उपचारांना एक नवी दिशा मिळणार आहे. 

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी लस शोधणारे डॉक्टर टोनी ढिल्लन कोण?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. टोनी ढिल्लन यांनी आतड्यांसंबंधी कर्करोगावरील नव्या लसीवर काम सुरू केलं आहे. 53 वर्षीय डॉ. ढिल्लन यांचे आजोबा 1950 च्या दशकात पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील एका गावातून ब्रिटनमध्ये आले होते. ब्रिटनमध्ये येऊन त्यांनी ब्रायलक्रीम येथील एका कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. ढिल्लन हे रॉयल सरे हॉस्पिटल ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि ऑन्कोलॉजीचे सीनियर लेक्चररही आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रोफेसर टिम प्राइस यांच्या सहकार्यानं आतड्यांसंबंधी कर्करोगावरील या लसीवर डॉक्टर ढिल्लन गेली 5 वर्ष काम करत होते.

15 टक्के रुग्णांना उपचार घेता येणार 

आतड्याच्या कर्करोगानं ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांसाठी ही लस प्रभावी ठरणार नाही, पण केवळ 15 टक्के रुग्णांसाठी ही लस प्रभावी ठरणार आहे. या लसीचे तीन डोस शस्त्रक्रियेपूर्वी दिले जातात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते. लसीबाबत बोलताना डॉक्टर ढिल्लन यांनी सांगितलं की, “आमचा अंदाज आहे की, जेव्हा रुग्ण ऑपरेशनसाठी जातात, तेव्हा त्यांच्यातील कर्करोगाचे प्रमाण खूप कमी होईल आणि काही रुग्णांच्या शरीरातून कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नाहीशाही होऊ शकतात. आम्हाला चाचण्या करून हे सिद्ध करण्याची गरज आहे आणि आम्ही तेच करणार आहोत.”

आई-वडील कारखान्यात काम करायचे

ऑस्ट्रेलियन क्लिनिकल-स्टेज इम्युनो-ऑन्कोलॉजी कंपनी इम्युजीननं ही लस तयार केली आहे. लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये 44 रुग्णांना सहभागी करण्यात येणार आहे. डॉ. ढिल्लन यांचे आजोबा सर्वात आधी साउथॉलमध्ये राहत होते, नंतर ते ब्रायलक्रीम कारखान्यात काम करण्यासाठी मेडेनहेडला गेले. तर, डॉक्टर ढिल्लन यांचे वडील 1960 च्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये आले होते, आणि 1967 मध्ये त्यांची आई जालंधरमधील बिलगा इथून त्यांच्या वडिलांशी लग्न करण्यासाठी ब्रिटनला आली. ढिल्लन यांचे आई-वडील दोघेही कारखान्यात काम करायचे. डॉक्टर ढिल्लन यांनी सांगितलं की, त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षण घेतलंच नाही आणि कदाचित त्यांना मी काय काम करतोय, याबाबतही माहिती नसेल. डॉक्टर ढिल्लन यांच्याबाबत सांगायचं झालं तर, त्यांनी  यूसीएलमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. इंपीरियल कॉलेज लंडनमधून त्यांची त्यांची पीएचडी पूर्ण केली आणि ऑक्सफर्डमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आतड्यांच्या कॅन्सरवरील वॅक्सिन ट्रायलचे ते प्रमुख संशोधक आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Weight Loss Tips : सगळे म्हणतात, जिऱ्याचं पाणी प्या, वजन कमी होईल; पण खरंच असं होतं का?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts