वडिलांनी लेकीचे नको ते फोटो पाहिले अन् तिथेच जीव सोडला, मुलीच्या पतीनेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Husband Upload Nude Photo Of Wife: पत्नीने माहेराहून हुंडा (Dowry Case) आणला नाही म्हणून पतीने अमानुष कृत्य केलं आहे. लाडक्या लेकीसोबत घडलेला हा प्रकार पाहून महिलेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले

उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये ही घटना घडली आहे. महिलेच्या पतीने तिच्या माहेरच्यांकडून हुंड्यात लग्जरी कारची मागणी केली होती. मात्र, त्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळं त्याने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले. मुलीचे न्यूड फोटो पाहताच तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

हुंड्यासाठी केला छळ

पोलिसांनी महिलेल्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह नक्श बंदियान नावाच्या व्यक्तीसोबत झाला होता. त्यांच्या लग्नात वडिलांनी ३० लाख रुपये खर्च केले होते. मात्र तरीही सासरची मंडळींना अधिक हुंडा हवा होता. हुंड्यासाठी ते महिलेचा सतत छळ करत होते. 

नंणदेच्या पतीचे अश्लील कृत्य

सासरच्या मंडळींनी लग्जरी कार आणि २० लाख रुपयांसाठी तिचा छळ करत होते. तर, तिची नणंद आणि तिचा पतीदेखील तिला त्रास देत होते. नणंद तिच्या खोलीबाहेर उभी राहत असे तर तिचा नवरा खोलीत जाऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य करत असे, असंही तिने तिच्या तक्रारीत नमूद केलं आहे. मागणी पूर्ण न केल्यास तिला जिवंत जाळण्याची धमकी तिच्या नणंदेने व सासऱ्यांनी दिली होती, असंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. 

पतीने केले फोटो एडिट

लग्नानंतर महिलेचा पती लगेचच कतारला गेला होता. तिथून फोनवरुन तो तिला धमकावत असे. पतीने पीडित महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. पीडितेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने तिचे फोटो एडिट करुन व्हायरल केले होते. ते फोटो तिच्या वडिलांनी देखील पाहिले होते. त्यामुळंच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. महिलेने तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पतीच्या मित्रासोबत अफेअर

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचे पतीच्या मित्रावर प्रेम बसले. दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने तिच्यावर हात उचलला याचा राग मनात धरुन तिच्या प्रियकराने मित्राची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Related posts