School children in the country are unfit shocking information is revealed from the health survey

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Education News: देशातील शाळकरी मुलांसंदर्भात एक सर्व्हेक्षण करण्यात आलंय. या सर्व्हेक्षणातून शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरूस्ती आणि चांगल्या आरोग्याचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. पाच पैकी दोन मुलांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीर वस्तुमान निर्देशांक योग्य नसल्याचं समजलंय. शिवाय चार पैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित ‘एरोबिक’ क्षमता नाही याची माहिती मिळाली आहे. 

या सर्व्हेक्षणातून, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने केलेल्या 12 वं वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलं आहे. ‘एज्युस्पोर्ट्स इन स्कूल फिजिकल एज्युकेशन कॅम्प’ या उपक्रमाद्वारे देशभरातील शाळांमधील मुलांचे शरीर बीएमआय, ‘एरोबिक’ क्षमता, लवचिकता, शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद अशा विविध निकषांच्या आधारे शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यात आली. 

सर्व्हेक्षणातून समोर आलेली माहिती

या सर्वेक्षणात देशातील 250 शहरं आणि गावांमधील विविध शाळांमधील 7 ते 17 वर्षे वयोगटांतील 73 हजारपेक्षा अधिक मुलांचा समावेश होता. शालेय मुलांची शारीरिक तंदुरुस्ती खूपच खालावल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं होतं. त्यामुळे एकंदरीत शालेय मुलांचं आरोग्य सुदृढ नसल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. 

निरोगी ‘बीएमआय’ पातळी असलेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत जास्त आहे. लवचिकता आणि शरीराच्या वरच्या भागातील ताकद या बाबतीत मुली-मुलांच्या पुढे, तर एरोबिक क्षमता आणि शरीराच्या खालच्या भागाची ताकद याबाबतीत मुली मुलांपेक्षा मागे असल्याचं लक्षात आलंय. दर आठवड्याला दोनपेक्षा जास्त शारीरिक शिक्षणाचे तास असणाऱ्या शाळांमधील मुलांची तंदुरुस्ती अधिक चांगली असल्याचं दिसून आलं आहे.  

शारीरिक शिक्षणाचं महत्त्व कमी

सर्वेक्षणाबाबत ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मजमुदार यांनी माहिती दिली तेव्हा म्हणाले, शालेय प्रशासन आणि पालकांच्या दृष्टीने अभ्यासापेक्षा शारीरिक शिक्षणाचं महत्त्व कमी असल्याचं पहायला मिळतं. मुलांना खेळण्यासाठी, शारीरिक व्यायामासाठी कमी वेळ मिळतो. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून खेळाकडे पाहण्यात येतं.

Related posts