business paytm fastag working or not after 29th february 2024 will you transfer

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Paytm FASTag Update: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत.  NHAI च्या रोड टोलिंग ऑथॉरिटी IHMCL ने वाहन चालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त 32 अधिकृत बँकांकडून FASTags खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 जानेवारीला पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL) 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेट किंवा फास्टॅगमध्ये पैसे जमा करुन घेण्यास बंदी घातली आहे. ज्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये पैसे आहेत ते कोणत्याही वेळी काढू शकतात. 

RBIने दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, FASTags, NCMC कार्ड इत्यादीमध्ये कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहाराला परवानगी दिली जाणार नाही. ही कारवाई पेटीएम पेमेंट बँकेवर आहे. पेटीएम अ‍ॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. तुमच्या मनातही Paytm FASTag बाबत कोणते प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला यावरची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

प्रश्‍न: ज्यांच्याकडे 29 फेब्रुवारी 2024 नंतरही पेटीएम फास्टॅगमध्ये पैसै शिल्लक आहेत, ते किती दिवस वापरू शकतात?

उत्तर : जो पर्यंत तमुच्या पेटीएम फास्टॅगमध्ये पैसे शिल्लक आहेत, तोपर्यंत ते तुम्ही वापरु शकता. पण त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार किंवा टॉप-अप करता येणार नाही.

प्रश्‍न :  Paytm FASTag बंद होणार का?
उत्तर : IHMCL ने वाहन चालकांना पेटीएम पेमेंट्स बँक वगळता इतर 32 अधिकृत बँकांकडून FASTags खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, IHMCL ने 19 जानेवारी 2024 रोजी लिहिलेल्या पत्रात पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन FASTags जारी करण्यास बंदी घातली आहे. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएम फास्टॅगमध्ये जितकी रक्कम शिल्लक आहे, तोपर्यंत तुम्ही याचा वापर करु शकता. पण पैसे संपल्यानंतर Paytm FASTag वापरता येणार नाही.

प्रश्‍न  Paytm FASTag सध्या सुरु आहे का?
उत्तर : ग्राहकांना बचत खाते, चालू खाते, प्रीपेड प्रोडक्ट, फास्टॅग आणि नॅशनल मोबिलिटी कार्डसह इतर खात्यांमधून थकबाकीची रक्कम वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. RBI ने Paytm FASTag युजर्सना शिल्लक रक्कम वापरण्याची परवानगी दिली आहे. पण 29 फेब्रुवारीनंतर ते या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत.

Paytm FASTag कसं रद्द करणार?
उत्तर : तुम्ही Paytm FASTag बंद करू शकता. पण त्यानंतर याचा वापर करता येणार नाही. Paytm FASTag रद्द करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा

– सर्वात आधी फास्टॅग पेटीएम पोर्टलवर लॉगिन करा. यात यूजर आयडी, वॉलेट आयडी आणि पासवर्ड टाका
– आता फास्टॅग नंबर, तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असलेली माहिती नोंदवा
– त्यानंतर पेजच्या तळाला असलेल्या हेल्प अँड सपोर्ट पर्यायवर क्लिक कला
– आता ‘Need Help With Non-Order Related Queries? वर क्‍ल‍िक करा
– यानंतर फास्टॅग प्रोफाईल अपडेट करण्यासंबंधी माहितीचा पर्याय निवडा
– पुढे आय वॉन्ट टू क्लोज माय फास्टॅग पर्यायावर क्लिक करा आणि पुढच्या स्टेप्सचं पालन करा

पेटीएम फास्टॅग कसं ट्रान्सफर करायचं?
थेट ट्रान्सफर करणं शक्य नाही. नवीन टॅग खरेदी करण्यासाठी आणि तो तुमच्या वाहन क्रमांकावर जारी करण्यासाठी, तुम्हाला HDFC, ICICI बँक सारख्या नवीन FASTag जारी करणाऱ्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. FASTag इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही. 

पेटीएम कस्टमर केअर नंबर
पेटीएमचा कस्टमर केअर नंबर 0120-4456456, 0120- 4770770

पेटीएम फास्टॅग कस्टमर केअर नंबर
यूजर 1800-120-4210 या नंबरवर कॉल करु शकतात.

Related posts