NCP Crisis Hearing Supreme Court ncp shradchandra pawar name

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supreme Court, New Delhi : पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे  नाव कायम राहणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.19) दिलाय. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायलयाने हा निर्णय दिला आहे. शरद पवार गटाने चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. आता लगेच अधिवेशन आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला तात्पुरते नाव दिले आहे. काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे आम्हाला दिलेलं नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या, असा युक्तीवाद मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. फूट वगळून विलीनकरणाची तरतुद करण्यात आली, त्याचा उद्देश काय, मतदारांचे काय? असे सवालही सर्वोच्च न्यायालयाने केले आहेत. 

[ad_2]

Related posts