अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बुधवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. पालकांनी चमत्कारिक उपचार करण्याच्या नावाखाली मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी इथल्या गंगा घाटावर मावशीने पाच वर्षाच्या निष्पाप मुलाला गंगा नदीत बुडवून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मावशीला अटक केली. पोलीस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More