( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Arrest: देशातल्या अनेक दिग्गज मंत्र्यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. तसेच त्यातील काहींना अटक देखील आहे. भाजपविरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी नोटीस पाठवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. ईडी अटकेच्या दबावामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतो. दरम्यान मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले. तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना 14 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. या अटकेच्या कायदेशीरतेबाबत खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद झाला. मद्रास उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि…
Read More