‘या’ 6 जागांवरुन महायुतीत रस्सीखेच! तातडीने दिल्लीला जाणार CM, दोन्ही उपमुख्यंत्री; शाह काढणार तोडगा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत काही नेते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार असून जागावाटपावर तोडगा काढण्याचा महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचा प्रयत्न आहे. …तर जाहीर होतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं आज सायंकाळी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार होती. मात्र दुपारीच महायुतीचे नेते दिल्लीला रावाना होणार असून दुपारीच या सर्व नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. पूर्वीनियोजित वेळापत्रकामध्ये…

Read More

‘तातडीने तोडगा काढा’, अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.  राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. त्याबद्दल सध्याच्या सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…

Read More