‘आठवड्याचे 70 तास काम करा’, म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला ‘मजा मारत इंग्लंड देश…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे.  नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत? “देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत…

Read More