“काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण…”; खरगेंचं विरोधकांच्या बैठकीत विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition Meet Mallikarjun Kharge On PM Post: देशात पुढील वर्षी म्हणजेच 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. याचसंदर्भात आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान पदासंदर्भात मोठं विधान केलं आहे. काँग्रेस पक्षाला पंतप्रधान पदामध्ये रस नाही असं खरगेंनी म्हटलं आहे. आम्हाला सत्ता किंवा पंतप्रधान पदामध्ये रस नसल्याचं खरगेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत म्हटलं आहे. काँग्रेसने विरोधकांना एकत्र येण्यास विरोध असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्यानंतर पक्षाकडून आज जाहीरपणे ही भूमिका घेण्यात आली. पहिल्यांदाच काँग्रेसने सत्तेमध्ये इतर…

Read More