मणिपूरमध्ये शीर कापून प्रदर्शन, महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर आणखी एक नवा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. मणिपूरमधील घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने धक्का बसला आहे. व्हिडीओत कुकी (Kuki) समाजातील एका व्यक्तीचं शीर कापून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.  इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुकी समाजातील डेव्हिड थिक यांचं कापलेलं शीर बिष्णुपूर जिल्ह्यातील एका निवासी भागात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या कुंपणावर ठेवण्यात आलं होतं. डेव्हिड छीक यांची 2 जुलै झालेल्या हाणामारीत हत्या झाल्याचा संशय आहे. रात्री 12 वाजता…

Read More