…अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) EMU train climbs on platform: उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे जंक्शनवर मंगळवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास लोकल ट्रेन मथुरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चढल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या ईएमयू ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधीच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना मोठ्या दुर्घटनेची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढल्याने कोणीही जखमी झालं नाही.  नक्की घडलं काय? समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही ट्रेन मथुरा स्थानकामध्ये पोहचली. यामधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर रात्री 10 वाजून…

Read More