( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे…
Read More