केरळमधील ते 2 मृत्यू निपाहमुळेच! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; राज्याकडून लोकांना मस्क वापरण्याचा सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Kozhikode Nipah Case: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केरळच्या कोझिकोड येथे 2 व्यक्तींचा अनैसर्गिक मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाल्याच्या वृत्ताला दुजोराला दिला आहे. मांडविया यांनी निपाह व्हायरलच्या फैलाव झाल्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी तज्ज्ञांची एक टीम केंद्र सरकारने पाठवल्याची माहिती दिली आहे. “मी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यंदाच्या मौसमामध्ये या विषाणूसंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. या विषाणूची प्रकरणं समोर येत आहे. हा विषाणू वटवाघुळांच्या माध्यमातून पसरतो. आरोग्य मंत्रालयाने काही निर्देशक तत्वांचा समावेश असणारं पत्रक तयार केलं असून त्यात काय काळजी घ्यावी…

Read More