( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय. तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…
Read More