Video : बुटाने तुडवले, छातीवर लाथ मारली; कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीला पोलिसाकडून मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लोकांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस त्यांच्याच जीवावर उठत असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून (UP Crime) समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका पोलीस हवालदाराने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गाझियाबाद पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित…

Read More