( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) बरेली जिल्ह्यातून एक क्रूरतेची घटना समोर आली आहे. बरेलीत एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. दोन मुस्लिम तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत मैत्रीचे नाटक करणाऱ्या एका मुलीनेच पीडितेला हॉटेलवर नेलं होतं. आरोपी सामुहिक अत्याचार करत असताना तिच्या मैत्रिणीने हा सगळा प्रकार कॅमेरात कैद केला होता. एवढेच नाही तर पीडितेला गोमांसही खाऊ घातले आणि आता तू मुस्लिम झाली आहेस असे सांगितलं गेले. पोलिसांनी (UP Police) या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
बरेली येथे राहणाऱ्या एका तरुणीने महिलेने दोन तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की तिला ‘जबरदस्तीने गोमांस खायला दिले’, बेशुद्ध केले आणि सामूहिक बलात्कार केला. आपली मैत्रीणच हॉटेलमध्ये घेऊन गेली होती. तिथे त्याच मैत्रिणीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर व्हिडिओ दाखवून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे लाखो रुपयांची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित महिलेने तिच्या मैत्रिणीकडून काही पैसे उसने घेतले होते. घेतलेले पैसे परत देण्यासाठी तिने 1 सप्टेंबर रोजी मैत्रिणीशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्रिणीने पीडित महिलेला 2 सप्टेंबर रोजी एका कॅफेमध्ये बोलावले होते.जेव्हा महिला कॅफेमध्ये पोहोचली तेव्हा तिची मैत्रिण मित्र शोएब आणि नाजिम नावाच्या तरुणांसह तिथे आली होती. कोणत्यातरी बहाण्याने ते पीडितेला हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे तिला बळजबरीने गोमांस खायला दिले आणि बेशुद्ध केले. त्यानंतर तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग सुरू झाले. माझ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, असे पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटलं.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे लग्न ठरले आहे. जेव्हा ती आरोपींना पैसे देऊ शकली नाही तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ तिच्या होणाऱ्या
पतीला पाठवला. यातील आरोपी शोएब हा बी.फार्माचा विद्यार्थी आहे आणि दुसरा आरोपी नाजिम केस कापण्याचे काम करतो. दोन्ही आरोपी तरुण काश्मीरला पळून जाण्याचा विचार करत होते. मात्र तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली.
दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कलम 406, 323, 354, 376 ड, 384 आणि 325 अनुसूचित जाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तिसर्या मुलीलाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.