‘पूर्णपणे सहमत’; नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: काही दिवसांपुर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी एक विधान केले होते ज्याची बरेच दिवस चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. जगाशी स्पर्धा करायची असेल तर तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवं यावर त्यांनी आपलं मतं माडलं होतं. त्यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया येयला सुरूवात झाली होती. अनेक सेलिब्रेटींनी आणि विचारवंतांनी यावर आपली मतं मांडायला सुरूवात केली होती.

त्यातून काही जणं त्यांच्याशी सहमत होते तर त्यातील काहींनी त्यांच्या या विधानावर आपली नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगली. आताही त्यांच्या या विधानावर मतंमतांतरे येण्याचा सपाटा कायम आहे. त्यात आता अशाच एका उद्योगपतीनंही आपलं मतं माडले आहे. ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी यावर आपलं मतं मांडले आहे. 

आत्तापर्यंत वीर दास, चेतन भगत, अश्रीर ग्रोवर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात भाविश अग्रवाल यांनीही आता उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी आपल्या X अकांऊटवरून लिहिलं आहे की, ”मी नारायण मुर्ती यांच्या विचारांशी सहमत आहे. आता ही वेळ नाही की आपण कमी काम करावं आणि आपलं मनोरंजन करावं. त्यापेक्षा आता हीच योग्य वेळ आहे की आपण एकत्र येत आपल्या या एका पिढीसाठी सगळं करायला हवंय जे इतर देशांनी अनेक पिढ्यांपासून तयार केले आहे.”  त्यांना नारायण मुर्तीं यांचा हा विचार पटला आहे. त्यामुळे भाविश यांचीही सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे. त्यांनी अजून एक ट्विट केले आहे ज्यात फक्त 70 तास नाही तर 140 तास असं म्हटलं आहे. 

हेही वाचा : अखेर वायूचा चेहरा दिसला; सोनम कपूरनंच शेअर केला लेकाचा फोटो

मध्यंतरी नारायण मुर्ती यांनी करीना कपूरवरही एक विधान केले होते. ते ज्या विमानातून प्रवास करत होते त्याच विमानातून अभिनेत्री करीना कपूरही प्रवास करत होती. तेव्हा तिला पाहताच अनेक जणांनी तिच्याशी बोलण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी करीनानं त्यांना अजिबातच भाव दिला नाही.

त्यामुळे त्यावर नाराज होत जेव्हा आपल्याला कोणतरी प्रेम देत असेल तर त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मलाही असे अनेक लोकं भेटतात आणि मी त्यांच्याशी काहीवेळ तरी भेटतो, बोलतो परंतु करीनानं असं अजिबातच दाखवलं नाही. मी म्हणत नाही की तूम्ही नेहमी तसंच करावं परंतु योग्य पद्धतीनं तुम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न करू शकता, असं म्हणत त्यांनी करीनावर टीका केली होती. तेव्हाही सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. 

Related posts