( प्रगत भारत । pragatbharat.com)
Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत.
द टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, अजरबैजान (Azerbaijan) नावाचा 36 वर्षीय रशियन भाषा बोलणारा तरुणाने लिस्बन येथील एका रेस्तराँमध्ये डाळिंबाचा ज्यूस (pomegranate) ऑर्डर केला होता. मात्र, सुरुवातीला ज्यूस ऑर्डर करताना त्याला भाषेची अडचण येत होती. त्यामुळं त्याने ऑनलाइन ट्रान्सलेटरची मदत घेतली. तरुणाने डाळिंब हा शब्द पोर्तुगालमध्ये भाषांतर करण्यासाठी एका लँग्वेज अॅपचा आधार घेतला. मात्र या अॅपने चुकीचे भाषांतर केले.
अॅपने भाषांतर केलेला शब्द खरा मानून या तरुणांने डाळिंबाचा ज्यूस (पॉमग्रेनेड ज्यूस) मागवण्या ऐवजी ‘ग्रेनेड’ची ऑर्डर दिली. ऑर्डर घेणाऱ्याला सुरुवातीला वाटलं की हा व्यक्ती त्याला ग्रेनेडने मारण्याची धमकी देत आहे आणि त्याने थेट पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिस ही तातडीने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले.
पोलिसांनी या पर्यटकाला ताब्यात घेतले व त्याची चौकशी करण्यासाठी जवळच्याच पोलिस स्थानकात घेऊन गेले. मात्र, त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याच्या कडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र सापडले नसल्याचे समोर आले. त्याच्या हॉटेलच्या खोलीची तपासणीदेखील करण्यात आली. मात्र, तिथेही काहीच आढळले नाही. त्यानंतर लिस्बन पोलिसांनी त्याच्या डेटाबेसमध्ये आणि पोर्तुगालच्या अँटी टेररिज्म कोऑर्डिनेशन युनिकअंतरर्गंतदेखील त्याची चौकशी करण्यात आली. मात्र तिथूनही काहीच सापडले नाही.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन भाषेत ग्रेनेड आणि डाळिंबासाठी एस समान शब्द आहे. मात्र पोर्तुगालमध्ये दोन वेगवेगळे शब्द आहेत. रोमाचा अर्थ डाळिंब आणि ग्रेनाडाचा अर्थ ग्रेनेड असा होतो. भाषांतराच्या अॅपने केलेल्या गोंधळामुळं हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्यक्तीने मिल्कशेक ऑर्डर केला होता मात्र मिल्कशेकच्या कपात लघुशंका असल्याचे समोर आले आहे. फॉक्स 59 नुसार, युटा येथील कालेब वुड्सने या आठवड्याच्या सुरुवातीला फुड डिलिव्हरी अॅप ग्रुबहबमधून मिल्कशेक ऑर्डर केला होता. घरी मिल्कशेकची ऑर्डर तर आली मात्र, त्याची चव पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच हादरली.