( प्रगत भारत । pragatbharat.com)
Body Heat Problem Solution : अनेकवेळा आपल्याला शरीरातील उष्णतेचा मोठा त्रास जाणवत असतो. कडक उन्हाळ्यात यात अधिक भर पडते. सध्या जून महिना सुरु झाला तरी गर्मी कायम आहे. यातच शरीरातील उष्णता त्रास देत असते. यावर काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत, जे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.
मान्सून सुरु झालाय. मात्र, उकाड्यातून सुटका मिळालेली नाही. जून महिना सुरु झाला तरी पाऊस म्हणावा तसा सक्रीय झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण देशात कडक उन्हाचा तडाखा दिसून येत आहे. अशा स्थितीत उष्माघात, दमटपणा आणि घामाने सर्वजण हैराण झाले आहेत. उष्णतेमुळे शरीरातील उष्णताही वाढते. जर तुम्ही देखील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर काही हे 5 सोपे उपाय करता येऊ शकतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील उष्णता कमी करु शकता. या सर्व पद्धतीने तुमचे शरीर हळूहळू थंड होईल. जर शरीरातील उष्णता झपाट्याने कमी झाल्यास सर्दी- खोकला आणि ब्रेन स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी…
ताक
शरीरातील उष्णता दूर करण्यासाठीही ताक फायदेशीर ठरते. भरपूर प्रथिने आणि चांगले बॅक्टेरिया असलेले ताक शरीराला थंड ठेवते.
काकडीचा रस
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडीच्या रसाचा आहारात समावेश केला पाहिजे. काकडीचा रस शरीराला हायड्रेट ठेवतो. याशिवाय हा ज्यूस प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते.
नारळ पाणी
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी बेस्ट आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम समृद्ध, नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. शरीराचे तापमान सुधारण्यासाठी दररोज नारळाचे पाणी प्यायले पाहिजे.
गुलकंद सरबत
शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात गुलकंद सरबत देखील समाविष्ट करु शकता. हे प्यायल्याने तुमच्या शरीरातील उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल.
पुदिना पाणी
उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. कूलिंग इफेक्टमुळे पुदिना शरीर थंड ठेवते आणि शरीराचे तापमान राखते. त्याच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे, पुदिन्याचे पाणी देखील शरीराला हायड्रेट करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)