Horoscope 29 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी आज कोणतंही नवं काम सुरु करु नये; जाणून घ्या काय सांगतं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 29 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. अशा परिस्थितीत अनेकदा मनाला मिळणारा दिलासा खूप महत्त्वाचा ठरतो. अनेकांच्याच मते ग्रहतारे हेच काम करतात, आपल्याला कुठं सावध व्हायचंय याचे संकेत देतात. जाणून घ्या कसं आहे तुमचं आजचं राशीभविष्य… 

मेष (Aries)

आजच्या दिवशी अपेक्षांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. नवे करार फायद्याचे ठरतील. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार आहे.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी जुनी कामं पूर्ण करण्याच्या मागे लागा. इतरांवर मात करण्याची इच्छा तीव्र होईल.  

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज जे काम हाती घ्याल त्याचा काही ना काही फायदा होणार आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कामामध्ये येणारे अडथळे तुमचा त्रास वाढवू शकतात. ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी अर्धवट असलेली कामे पूर्ण होतील. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम करा.  

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींनी कोणतेही नवे काम सुरु करु नका. कार्यक्षेत्रातील घडामोडी तुमचे स्थान विचलीत करु शकतील.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी अचानक धन लाभ होईल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेऊ शकता. खास व्यक्तीशी तुमच्या मनातील गोष्ट शेअर कराल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अनेकांची मदत मिळू शकते. मनातील गोष्ट खास व्यक्तीशी शेअर करु शकता.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी समस्यांमधून सुटका होऊ शकते. मोठ्या व्यक्तींशी बोलणं होण्याची शक्यता आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts