delhi cm arvind kejriwal Judicial Custody till 15 april tihar jail number two

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arvind Kejriwal Judicial Custody : मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह आणि आता आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तिहार जेलमध्ये (Tihar Jail) पोहोचले आहेत. सोमवारी दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. कडकोट सुरक्षा व्यवस्थेत अरविंद केजरीवाल यांना बरॅकनंबर दोनमध्ये आणण्यात आलं. या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आहे. तिहार जेलमधील बरॅक नंबर 2 हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. जेलच्या अधिकाऱ्यांची इथं करडी नजर असते. कारण या बरॅकमध्ये हायप्रोफाईल व्यक्तींना कैद केलं जातं. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहारमध्ये पोहोचण्याआधी आपचे नेते संजय सिंह यांना बरॅक 2 मधून  5 मध्ये हलवण्यात आलं. मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या सर्वांना तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. मनीष सिसोदिया बरॅक नंबर 1 आणि सत्येंद्र सिंह बरॅक नंबर 7 मध्ये बंद आहेत. याशिवाय तेलंगनाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना बरॅक नंबर 6 मध्ये ठेवण्यात आलं आहे. आपचे विजय नायर जेल नंबर 4 मध्ये बंद आहेत. बरॅक नंबर 4 मध्ये श्रद्धा मर्डर केसचा आरोपी आफताब पूनावालासुद्धा कैदेत आहे. 

बरॅक नंबर 2 ची कहाणी
तिहार जेलमधल्या बरॅक नंबर 2 ची कहाणीसुद्धा खूप रंजक आहे. याआधी या बरॅकमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणइ बिहारचा बाहुबली नेता मोहम्मद शाहबुद्दीन सारख्या कुख्यात कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. तिहार जेलची सुरक्षा व्यवस्था अतिसुरक्षित मानली जाते. यामुळे हाय प्रोफाईल व्यक्तींना तिहार जेलमध्ये ठेवलं जातं. 2015 मध्ये इंडिनेशियामधून अटक केल्यानंतर डॉन छोटा राजनला भारतात आणण्यात आलं. 2018 रोजी मुंबईतले पत्रकार जेडे हत्याकांड प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. 

त्याआधी 2017 मध्ये बिहारमधील बहुचर्चित ॲसिड हल्ला प्रकरणात माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा झाली. शहाबुद्दीनला सीवान जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर पत्रकार राजदेव रंजनच्या हत्येचाही आरोप आहे. राजदेव रंजन यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टा आपल्या जीवाला धोका असल्याची याचिका दाखल केली होती. शहाबुद्दीनला सीवान जेलमध्ये ठेवलं तर हे प्रकरण प्रभावित होऊ शकतं असा आरोप करण्यात आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शहाबुद्दीनला तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं. इथेच आजारपणामुळे शहाबुद्दीनचा मृत्यू झाला.

देशातलं सर्वात मोठं जेल
तिहार जेल देशातलंच नाही तर आशियातलं सर्वात मोठं जेल आहे. देशातील सर्वात धोकादायक कैदी या कारागृहात आहेत. यात दहशतवाद्यांपासून अंडरवर्ल्ड डॉन आणि कुख्यात गँगस्टरचा समावेश आहे. त्यामुळे या जेलची सुरक्षाही तितकीच कडेकोट आहे. पण यानंतरही जेलमध्ये गँगवॉर, हत्या, नशा, लाचखोरी सारख्या घटना घडल्या आहेत. तिहार जेलमध्ये सद्यपरिस्थितीत जवळपस 18 हजार कैदी आहे. यात 30 लहान-मोठ्या गँगचे प्रमुख, दहशतवाद्यांचा समावेश आहे. 

 

Related posts