High Uric Acid 5 Causes Build UP Crystal Which Affect Kidney; ५ कारणे ज्यामुळे होतो सांध्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचा खडा, खराब होते किडनी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कसा होतो किडनीवर परिणाम

कसा होतो किडनीवर परिणाम

वाढलेले युरिक अ‍ॅसिड किडनी स्टोन आणि किडनी फिल्टरेशन सिस्टिम अर्थात नसांमध्ये त्रास निर्माण करून किडनी फेल होण्याचे काम करू शकते. गाऊट समस्या महिलांपेक्षा पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र आता अनेक तरूणांनाही हा त्रास होतोय. जाणून घ्या ही महत्त्वाची कारणे.

लठ्ठपणा

लठ्ठपणा

युरिक अ‍ॅसिड वाढण्याच्या कारणांमध्ये लठ्ठपणा हे कारण महत्त्वाचे ठरते. Mayo Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार काही कारणं देण्यात आली आहेत, त्यामध्ये Obesity अर्थात लठ्ठपणा हे महत्त्वाचे कारण देण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास त्रास होतो आणि त्यामुळे शरीरात त्याचे खडे तयार होऊ शकतात.

(वाचा – संकेत जे सांगतात नसांमध्ये रक्त घट्ट होऊन साचतंय, हार्ट अटॅकचा धोका, या भाज्या खाणं टाळा)

अधिक प्युरिनचे पदार्थ खाणे

अधिक प्युरिनचे पदार्थ खाणे

युरिक अ‍ॅसिड केवळ शरीरात वाढत नाही तर त्याचे खडेही तयार होतात आणि ते अधिक त्रासदायक ठरतात. आहारामध्ये प्युरिनचे पदार्थ अधिक असतील तर युरिक अ‍ॅसिड अधिक प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे सीफूड्स, ऑर्गन मील्स अथवा अधिक प्रमाणात अल्कोहोल पिणं होत असेल तर ते वेळीच थांबवायला हवेत. WebMed ने दिलेल्या अहवालानुसार या ४ पदार्थांमध्ये अधिक प्युरिन आढळते.

(वाचा – रेमो डिसुझाच्या पत्नीने ४० किलो केले वजन घटवले, १०५ किलो वजनच्या लिझेलचा डाएट प्लॅन)

अधिक प्रमाणात अल्कोहोल

अधिक प्रमाणात अल्कोहोल

वर म्हटल्याप्रमाणे अधिक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन हे शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड अधिक प्रमाणात निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यामुळेच किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल होणे आणि किडनीला त्रास होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अल्कोहोलचा सर्वात जास्त परिणाम किडनीवर होत असतो याची सर्वांनाच कल्पना आहे.

(वाचा – ८०% व्यक्तींना Deja Vu ची होते जाणीव, ही घटना घडली असल्याचा होतो भास, काय आहे यामागील विज्ञान)

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब

Mayoclinic.org ने दिलेल्या अहवालानुसार शरीरामध्ये सांधेदुखी होण्यामागे उच्च रक्तदाब हे कॉमन कारण आहे. याला हायपरटेन्शन असेही म्हटले जाते. तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर युरिक अ‍ॅसिडचा परिणाम लवकर दिसून येतो आणि हे एक महत्त्वाचे कारण ठरते.

किडनी खराब होणे

किडनी खराब होणे

वर दिलेल्या महत्त्वाच्या कारणांमुळे युरिक अ‍ॅसिडचा खडा शरीरात निर्माण होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर याचा किडनीवर परिणाम होऊन किडनीही खराब होऊ शकते. याशिवाय मूत्रवर्धक औषधे आणि थायरॉईड हार्मोनमुळेही सांधेदुखी आणि युरिक अ‍ॅसिडचा त्रास होऊ शकतो.

[ad_2]

Related posts