100 कोटींचा Job Scam; टीसीएसचे 4 वरिष्ठ अधिकारी रडारवर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

TCS Job Scam: नोकरी घ्या, पैसे द्या… थोडक्यात नोकरी मिळवून देण्याचा मोबदला आर्थिक स्वरुपात घेण्याची पद्धत तशी फारच जुनी आहे. अमुक एका ठिकाणी तमुक एका व्यक्तीच्या ओळखीनं नोकरीला लागलो असं म्हणणारेही तुम्हाआम्हाला काहीजण भेटले असतील. गेल्या काही वर्षांमध्ये ही प्रकरणं तुलनेनं कमी ऐकू आली. पण, सध्याच्या घडीला झालेल्या एका खळबळजनक गौप्यस्फोटामुळं देशातील खासगी आस्थापनांना हादराच बसला आहे. 

देशातील सर्वात मोठ्या IT Firm टीसीएसमधून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, इथं नोकरीच्या बदल्यात अनेकांकडून आर्थिक मोबदला उकळत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटले आहेत. 

Live Mint नं जागल्या (व्हिसलब्लोअर)च्या माहितीचा हवाला देत यासंबंधीचा गौप्यस्फोट केला. जिथं सर्वात मोठ्या आयटी कंपनीतील अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवला होता. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य परिचालन अधिकारी यांना त्यानंही माहिती दिली. या माहितीनुसार रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (RMG)चे वैश्विक प्रमुख ई.एस. चक्रवर्ती नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्मकडून मोठा नफा मिळवत असल्याचं स्पष्ट झालं. 

TCS मध्ये  खळबळ 

सदरील घोटाळ्याची माहिती मिळताच टीसीएसकडून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात आली. ज्यानंतर चक्रवर्ती यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं तर, रिसोर्ट मॅनेजमेंट ग्रुपमधील 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. इतकंच नव्हे, तर या कंपनीसाठी काम करणाऱ्या तीन स्टाफिंग कंपन्यांनाही ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. 

मुळात सध्या हे प्रकरण प्राथमिक स्तरावर असून यामध्ये नेमक्या किती रकमेची देवाणघेवाण झाली हे उघड होऊ शकलेलं नाही. पण, यामध्ये सहभागी व्यक्तींनी मिळून तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याची बाब नाकारता येत नाही. सोप्या शब्दांत सांगावं तर, आरएमजी डिवीजन दर दिवशी नव्या नोकऱ्यांसह 1400 इंजिनिअर्सना विविध पदांवर रुजू करतं. म्हणजेच दर मिनिटाला एक कर्मचारी नोकरीवर येतो. परिणामी हा घोटाळा किती मोठा असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. 

IT क्षेत्रातून मोठ्या संख्येनं युवा वर्ग टीसीएसकडे एक चांगली नोकरदार संस्था म्हणून ओळखली जाते. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या संस्थेला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त आहे. अशा या कंपनीमध्ये 2022 च्या अखेरपर्यंत 6.15 लाख कर्मचारी काम करत होते. मागील तीन वर्षांमध्ये या कंपनीमध्ये 3 लाखांहून नव्या पदांवर नोकरभरती करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्टाफिंग फर्मचीही मदत घेतली जाते. तूर्तास टीसीएससाठी नेमक्या कोणत्या स्टाफिंग फर्म काम करतात ही नावं मात्र अद्याप समोर आलेली नाहीत. 

 

Related posts