इन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या ‘या’ सोप्या स्टेप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PAN Aadhaar Linking Status: तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा. दोन दिवसात फ्रीमध्ये लिंक करता येणार आहे. दोन्ही लिंक करण्याची डेडलाइन एका दिवसावर आली आहे. 30  जून 2023 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी 30  जूनपर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे होईल. त्याला पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय?

पॅन कार्ड सध्या सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक डॉक्यूमेंट बनले आहे. जर तुमचे पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होवू शकते. त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागू शकतो. यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न करता येत नाही. यासोबत शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या स्कीममध्ये गुंतवणूक करता येत नाही. पॅन कार्डला इनअ‍ॅक्टिव्ह होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही 30  जून 2023 आधी लिंक करणे गरजेचे आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की, नाही हे तुम्हाला माहिती नसेल तर या ठिकाणी काही सोप्या टिप्स आहेत. याच्या मदतीने तुम्ही हे तपासू शकता. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर 1 हजार रुपयाचा दंड भरुन तुम्ही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करु शकता.

पॅन-आधारचे स्टेट्स असं चेक करा

यासाठी सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइट वर जावे लागेल.
या ठिकाणी आधार सर्विसेजचा मेन्यू मिळेल. ज्यावर क्लिक करा. नंतर स्टेट्सवर क्लिक करा.
तेथे तुम्ही तुमचा पॅन नंबर टाकावा. नंतर कॅप्चा कोड भरा.
यानंतर पॅन आणि आधार लिकिंगचे स्टेट्स चेक करण्यासाठी Get Linking Status वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला काही सेकंदात माहिती समोर येईल. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही, ते समजेल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक कसे कराल?

पॅनला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सची ई-फाइलिंग वेबसाइट www.incometax.gov.in वर जा.
नंतर लॉगिन डिटेल्स टाका.
नंतर क्विक सेक्शनमध्ये जा. या ठिकाणी आपला पॅन, आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाका.
यानंतर ‘I validate my Aadhaar details’ च्या ऑप्शनची निवड करा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो या ठिकाणी भरा.

Related posts