Ashadhi Ekadashi Astro : आज कोणावर होणार पांडुरंगाची कृपा; पाहा त्यात तुमची रास आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi Ekadashi Astro : आषाढी एकादशीच्या निमित्तानं चला जाणून घेऊया कोणत्या राशींना होणार फायदा, कोणावर होणार पांडुरंगाची कृपा…. 

मेष (Aries)
कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. वडिलांची मोठी मदत होणार आहे. तेच तुमच्यासाठी पांडुरंगासारखे मदतीला धावून येणार आहेत. नात्यांमध्ये असणाता तणाव कमी होणार आहे. 

वृषभ (Taurus)
दिवस संमिश्र असेल. व्यवसायामध्ये जोडीदाराची मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. 

मिथुन (Gemini)
आज सर्व ताणतणाव दूर असणार आहेत. कुटुंबात अशांतता असेल. भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटतील. मित्रांसमवेत वेळ व्यतीत कराल. 

कर्क (Cancer)
व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. प्रभावी व्यक्तीमत्त्वांना भेटण्याची संधी मिळेल. आज आळ झटकून नव्या कामांची सुरुवात कराल. आईचा आशीर्वाद फळणार आहे. 

सिंह (Leo)
आज धार्मिक कार्यांमध्ये तुमचं मन रमणार आहे. कुटुंबात शुभवार्ता कळणार आहे. अविवाहितांसाठी लग्नाचा योग आहे. आज कुटुंबात आनंदी आनंद असेल. 

कन्या (Virgo)
आजारपणातून मुक्त व्हाल. घरात सुखशांती नांदेल. नव्या कामांची सुरुवात कराल, काही कामांमध्ये यश मिळवाल. एकंदर दिवस आनंदाचा असेल. 

तूळ (Libra)
देवाणघेवाणीचे व्यवहार कराल. एखाद्या नव्या वाहन खरेदीचा बेत आखाल. नकारात्मक शक्ती तुमच्या आजुबाजूला फिरकणारही नाहीत. एखादी व्यक्ती तुम्हाला भारावून सोडेल. 

वृश्चिक (Scorpio)
करिअरच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. पत्नीच्या सहकार्यानं व्यवसायात मोठी उडी घ्याल. आज मुलांच्या कर्तृत्त्वानं तुमची मान उंचावेल. 

धनु (Sagittarius)
अकडलेली कामं मार्गी लागणार आहेत. नोकरदार वर्गाला पगारवाढीची शुभवार्ता कळणार आहे. आरोग्य उत्तम असेल. 

 

मकर (Capricorn)
महत्त्वाची कामं मार्गी असतात. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात कराल. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. विठ्ठलाच्या कृपेनं सर्व कार्य मार्गी लागणार आहेत. 

कुंभ (Aquarius)
आज अशा एखाद्या व्यक्तीची भेट घडेल जो तुम्हाला यशाचा मंत्र देईल. अद्वितीय योगायोगानं तुम्हाला यश मिळेल. आजचा दिवस शुभ आहे. 

मीन (Pisces)
मित्रमैत्रिणींशी बऱ्याच दिवसांशी संवाद साधाल, जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. आजचा दिवस प्रचंड आनंदाचा आहे. 

Related posts