किडनीतील सडलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर फेकतील ५ फळं, दिसेल ३० दिवसात चमत्कार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लाल द्राक्ष

लाल द्राक्ष

लाल रंगाची द्राक्ष ही किडनी डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरतात. लाल द्राक्षामध्ये अनेक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून किडनीची आतून स्वच्छता करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच लाल द्राक्षामध्ये आढळणारे फ्लेवोनॉईड्स हे रक्ताची स्वच्छता करण्यास मदत करतात. द्राक्षात आढळणारे पोषक तत्व हे किडनीमध्ये इन्फ्लेमेशन होऊ देत नाही.

संत्रे आणि लिंबू

संत्रे आणि लिंबू

संत्रे आणि लिंबामध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात आढळते. दोन्ही फळं ही किडनीच्या स्वच्छता राखण्यासाठी उत्तम पर्याय मानली जातात. लिंबू पाणी अथवा संत्र्याच्या ज्युसमुळे किडनीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. तसंच शरीरातील असणाऱ्या फ्लुईडचे संतुलन राखण्यास याची मदत मिळते. याच्या नियमित सेवनामुळे किडनीतील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास याची मदत होईल.

(वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट)

टरबूज ठरेल उपयोगी

टरबूज ठरेल उपयोगी

उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज अथवा कलिंगड हे फळ किडनी डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरते. टरबूजमध्ये किमान ९० टक्के पाणी असते. यामधील आढळणारे पोषक तत्व किडनी डिटॉक्स करण्यास उपयुक्त ठरते. तसंच टरबुजातील असणारे लायकोपेन कंपाऊंड हे किडनीतील इन्फ्लेमेशनचा धोका कमी करण्यास मदत करते. टरबूजमध्ये असणारे ऑक्सिलेट, सायट्रेट, फॉस्फेट आणि कॅल्शियम हे किडनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

(वाचा – विटामिन बी१२ ची कमतरता भरून काढतील ही फळं आणि भाज्या, वेळीच करा समावेश)

बेरीज

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, क्रेनबेरी, रासबेरी अशी सर्व फळं अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकलयुक्त असून किडनीतील घाण साफ करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बेरीजच्या सेवनामुळे किडनीमधील सेल्स आणि इन्फ्लेमेशनचा धोका कमी होतो. किडनी फेल होत असेल तर त्यातील जमलेली घाण बाहेर काढण्यासाठी बेरीजचा वापर करता येतो.

(वाचा – ब्रश केल्यानंतरही दिसत असतील पिवळे दात तर सकाळीच खा हा काळा पदार्थ, हास्याने लागेल लोकांना वेड)

जांभूळ

जांभूळ

जांभूळ हे फळ मधुमेहासाठी जितके उपयोगी ठरते तितकेच किडनी डिटॉक्स करण्यासाठीही उपयोगी ठरते. सध्या जांभळाचा सीझन असून किडनी डिटॉक्स करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts