Loksabha Election : भाजपची दुसरी यादी तयार! 100 नावांचा झाला विचार, पुढील दोन दिवसांत जाहीर होणार नावं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवाऱ्यांची चाचपणी सुरु आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरीत जागेबद्दल काय निर्णय घेतला याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली असून यात अनेक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालंय समजतं. त्यानुसार भाजपची दुसरी यादी तयार झाली असून अनेक नावांवर खलबत झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ही यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. (Loksabha Election 2024 BJP Second List Ready 100 names were considered the names will be announced today…

Read More

29 दिवसात 26866 कोटींची गुंतवणूक… सर्वसामान्य भारतीयांनी मोडला विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 26866 Crore Investment In February: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. मागील काही काळापासून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा मागील 23 महिन्यांचा विक्रम भारतीयांनी मोडीत काढला आहे. भारतीयांनी फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजेच 29 दिवसांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 26 हजार 866 कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील जवळपास 2 वर्षांमधील ही मासिक स्तरावरील इक्विटी म्युच्युअल फंडातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. 23 टक्क्यांनी वाढ थिमॅटीक फंडांमधील गुंतवणूकदरांना मोठा…

Read More

‘पुढील काही दिवसात एक बाळ…’, हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात

( प्रगत भारत । pragatbharat.com) उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांनी एक्सवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढील काही दिवसांत एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगितलं आहे. हर्ष गोयंका यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा इशारा भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये बाळाच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे. यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टवर तुफान कमेंट्स केल्या आहेत.  हर्ष गोयंका यांनी पोस्टमध्ये बाळ वडिलांप्रमाणे एक कौशल्यवान क्रिकेटर होईल की आईप्रमाणे चित्रपटसृष्टीत करिअर…

Read More

मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; दोन मजली घराची मालकीण

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपल्याच पोटच्या मुलांना भीक मागायला लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि दोन मुलांनी रस्त्यांवर भीक मागायला लावत 44 दिवसांत तब्बल 2 लाख 50 हजार रुपये कमावले. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन आणि दुमजली घर आहे अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. शहरात भीक मागणाऱ्या 150 जणांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या असून, तिची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  “इंद्राबाई इंदूर-उज्जैन रोडवर लव-कुश इंटरसेक्शन येथे भीक मागताना आढळली. आम्हाला तिच्याकडे…

Read More

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत केली 86 कोटींची कमाई, HDFC बँकेचं मात्र नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात. अशीच काहीशी कमाल देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सनी केली आहे. एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणारे मालामाल गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आणि…

Read More

भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

'राम आएंगे' गाण्याचा अनोखा विक्रम, एका दिवसात बनवले 'इतके' रिल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

Read More

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तसेच हा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी रोजी देशात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त…

Read More

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024…

Read More

Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! ‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या स्थिती बदलचा परिणाम 12 राशींवर पडतो. पुढील 6 दिवसांमध्ये शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूची स्थिती बदलणार आहे. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक, 27 डिसेंबरला मंगळ धनु राशीत, 28 डिसेंबरला बुधही वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. तर 31 डिसेंबरला गुरू थेट मेष राशीत जाणार आहे. मंगळ, बुध, बृहस्पति आणि शुक्र यांच्या हालचालीतील बदलामुळे सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम (Transit of 4 planets mangal budh…

Read More