( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral News: अन्नाच्या शोधात एक माकड पिसत असतानाच त्याची नजर एका बॅगेवर पडली. बॅगेत आपल्याला खाण्यासाठी काहीतरी मिळेल या आशेने माकडाने धाव घेतली. यानंतर ती बॅग घेऊन तो जाऊन झाडावर बसला. पण माकडाने बॅग नेताच खाली मात्र एकच गदारोळ सुरु झाला. कारण या बॅगेत तब्बल 1 लाख रुपये होते. त्यामुळे लखपती झालेल्या या माकडाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) येथे घडलेल्या या घटनेची सध्या संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
मंगळवारी शहााबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती आली होती. त्याने स्वत:सोबत 1 लाखांची रोख रक्कम आणली होती. रक्कम असलेली बॅग त्याने गाडीलाच लावून ठेवली होती. माकडाने जेव्हा बॅग चोरली तेव्हा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
शराफत हुसेन हे दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनी आपली दुचाकी पार्क केल्यानंतर तिथे असणाऱ्या एका बाकड्यावर बसून आपली कागदपत्रं तपासत होते. शराफत हुसेन आपल्या कामात व्यग्र असतानाच माकड तिथे आले. तेथे पार्क करण्यात आलेल्या बँगांमध्ये काही सापडतंय का हे ते पाहत होते. यावेळी त्याच्या हाती हुसेन यांची बॅग लागली. त्यात 1 लाख रुपये असल्याचं दिसताच ते बॅग घेऊन पळून गेलं.
दुसरीकडे शराफत हुसेन यांना याची कल्पनाच नव्हती. हुसेन यांना माकड पैशांनी भरलेली बॅग घेऊन जात आहे हे कळण्याआधी ते गायब झालं होतं. यानंतर घटनास्थळी एकच गदारोळ सुरु झाला होता. सर्वजण माकडाचा शोध घेऊ लागले होते. यावेळी माकड एका झाडावर बसलं असल्याचं त्यांना दिसलं.
उपस्थित लोकांनी माकडाकडून आपली बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला. पण बॅग हाती लागत नव्हती. माकडाचा पाठलाग केला असता अखेर हुसेन यांना बॅग मिळवण्यात यश आलं. सुदैवाने त्यांचे सर्व पैसे सुरक्षित होते.
शहाबादमध्ये माकडांची दहशत वाढली असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना पकडण्यासाठी एक टीम नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडून देण्याचं काम करेल. शहाबादचे उपजिल्हाधिकारी अनिल कुमार यांनी सांगितलं आहे की, माकडांचा हैदोस कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका पातळीवर माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडून देण्यात येईल.