Tooth Loss And Teeth Whitening In Young Age Know Causes Treatment And Prevention To Avoid; कमी वयात दात सडून कमकुवत होण्यामागे हे आहे मोठं कारण, वेळीच करा उपाय नाहीतर तरूणपणीच लागेल कवळी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

का कमकुवत होतात दात?

का कमकुवत होतात दात?

आपल्या दातांना पाठिंबा देणारे हाड असते, ज्यावर हिरड्या असता. आपले दात हे हाडे आणि हिरड्यांवर टिकून असतात. जर हाडे अथवा हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झाले अथवा एखादी जखम झाली तर दात कमकुवत होऊन हलू लागतात.

हिरडे अथवा हाडांचा आजार कमी वयात झाल्यास, दात पडण्याचा धोका अधिक असतो. तसंच विटामिन डी च्या कमतरतेमुळेही दातांची समस्या उद्भवते. डायबिटीस रूग्ण अथवा ब्लड शुगर वाढल्यास, दातांना इन्फेक्शन होते आणि दात पडतात.

(वाचा – २०६ हाडांमध्ये भरायचे असेल कॅल्शियम तर फक्त दूध हाच पर्याय नाही, निवडा हे ५ ड्रिंक्स)

दातांमध्ये कीड लागणे

दातांमध्ये कीड लागणे

दात लवकर वयात खराब होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दातांमध्ये कीड लागणे. अनियमित स्वच्छता आणि दातांमध्ये घाण जमल्यामुळे दात लवकर खराब होतात आणि सडतात. दात हे अत्यंत संवेदनशील असून त्यांची रोज अधिक काळजी घ्यावी लागते. तसंच चिकट आणि गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यासही तरूणपणामध्ये दात अधिक प्रमाणात सडतात.

(वाचा – दाताच्या पिवळेपणापासून ते तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत गुणकारी ठरेल तुरटी, असा करा सोप्या पद्धतीने वापर)

दात पडण्यापासून कसे वाचवाल

दात पडण्यापासून कसे वाचवाल

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दात मजबूत बनविण्यासाठी हिरड्या आणि हाडांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. हिरड्यांना इन्फेक्शनपासून वाचवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योग्य ब्रशने दातांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःला दाताचा पिवळेपणा अथवा तोंडातील दुर्गंध स्वच्छता ठेवता येत नसेल तर वेळीच डेंटिस्टची मदत घ्यावी आणि दात क्लिन करून घ्यावेत.

(वाचा – ब्रश केल्यानंतरही दिसत असतील पिवळे दात तर सकाळीच खा हा काळा पदार्थ, हास्याने लागेल लोकांना वेड)

हिरड्यांच्या आजाराकडे लक्ष द्या

हिरड्यांच्या आजाराकडे लक्ष द्या

हिरड्यांमधून रक्त येणे अथवा खाताना दात दुखणे आणि हिरड्या दुखणे अशा समस्या असतील तर वेळीच तुम्ही याकडे लक्ष देऊन डॉक्टरांकडून उपाय करून घ्यावा. याशिवाय शरीरातील कॅल्शियम आणि विटामिनचा स्तर तपासून घ्यावा. कॅल्शियम अथवा विटामिन्सची कमतरता असल्यास, डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार वेळीच करून घेता येतो. दातांना सुरक्षित ठेवण्यासाठी डायबिटीसवर नियंत्रण ठेवावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts