Adhik Maas 2023 : आजपासून अधिक मास सुरु! महिनाभर ‘ही’ कामं करु नका अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Adhik Maas 2023 : आजपासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास (purushottam maas  2023), मल मास (Malmas 2023), संसर्प मास अगदी महाराष्ट्रात धोंड्याच महिना म्हटलं जातं. जवळपास 19 वर्षांनंतर  अधिक श्रावण मासाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. म्हणजे विष्णून आणि भगवान शंकराची एकत्र उपासना करण्याची ही सुवर्ण संधीच म्हणायला हवी. (adhik maas 2023 or purushottam maas Malmas 2023 Do not do these things till 16th August)

अनेक ठिकाणी अधिक मासाला खरमास असंही म्हणतात. खसमास म्हणजे खराब महिना, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य केली जातं नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव 30 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य गोचरच्या या प्रक्रियेला सूर्यसंक्रांत असं म्हटलं जातं. पण अधिक मासात सूर्य आपली रास बदलत नाही असं म्हणतात. त्यामुळे सृष्टी मलिन होते, म्हणून अशावेळी या महिन्याला मलमास असं संबोधलं जातं. 

महिनाभर काय गोष्टी चुकूनही करु नका!

दर तीन वर्षांनी अधिक मास येत असतो. आजपासून सुरु झालेला अधिक मास हा 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होईल. 

1. अधिक मासात शुभ कार्य म्हणजेच लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य नाही करायचं. त्याशिवाय विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृह प्रवेश हे शुभ कार्य करु नका. 

2. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका.

3. नॉनव्हेज खाऊ नका. 

4. मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान वर्ज्य असतं. 

5. गृहखरेदी, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करु नका. 

6. नवीन ठिकाणी देव दर्शनाला जाऊ नका. 

 7. वाईट शब्द किंवा अपशब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध ठेवू नका. 

 (Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts