धावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending Video : पुन्हा एका सोशल मीडियावर धावत्या बाइकवर अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. धक्कादायक म्हणजे या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि एक तरुण नाही तर दोन तरुणींचा हा व्हिडीओ आहे. रस्ते वाहतुकीच्या नियमांना फाट्यावर मारून दिवसाढवळ्या या दोघी धावत्या बाइकवर स्टंट करताना दिसून येतं आहे. एकमेकींच्या समोरासमोर बसून मीठी मारत किस करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 

या वर्षाच्या सुरुवातीपासून बाइकवर रोमान्स करतानाचे अनेक कपलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कधी बाइकवर तर कधी स्कूटवर अगदी कारच्या रुफ्र टॉपवर प्रेमाचे प्रदर्शन करणारे हे अश्लील चाळे सोशल मीडियावर व्हायरल झाले. स्वत:च्या जीवाची नाही तर रस्त्यावरील इतर लोकांच्या जीवाचीदेखील या लोकांना काळजी नाही हेच दाखविणारे हे व्हिडीओ होते. तरुण बाइक चालवत असताना तरुणी पेट्रोलच्या टाकीवर त्याचाकडे तोंड करुन बसून त्याला कधी मिठी मारताना तर कधी किस करताना दिसून आली. 

वाहूतक पोलिसांनी या बाइकस्वार तरुणांना पकडून शिक्षा आणि अद्दलही घडवली. मात्र सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध होण्यासाठी की अजून काही माहिती नाही पण अशाप्रकारचे व्हिडीओ बनवण्याचे धाडस काही बंद होताना दिसत नाही आहे. 

आता हद्दच केली राव!

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तर चक्क दोन तरुणी धावत्या बाइकवर अश्लील चाळे करताना दिसत आहेत. सर्व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत त्यांनी हा धोकादायक स्टंट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुणी एकमेकींकडे तोंड करुन बसल्या आहेत. एवढंच नाही तर त्या एकमेकींना मिठी मारताना दिसून येतं आहे. हद्दमध्ये त्या या धावत्या बाइकवर एकमेकींना  liplock ही करत आहेत. 

हा व्हिडीओ कोणी शूट केला आणि कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र बाइकच्या नंबर प्लेटवरुन हा व्हिडीओ तामिळनाडूमधील असल्याचा अंदाज लावता येतो. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ghantaa या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2.6 दशलक्ष व्ह्यूज आणि जवळपास 80,000 लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमधील तरुणींनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी मर्यादा सोडून वागत आहे. जीवघेणे स्टंट करत सगळ्यांचा जीवाशी खेळत आहेत. आपले जन्मदाते आणि आपल्या प्रेम करणारी व्यक्तींचाही या लोकांना विचार पडत नाही का हो?

Related posts