तुम्ही मित्राच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना त्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली. या चर्चेदरम्यान स्मृती इराणी यांनी झुबिन इराणी यांच्यासोबतचा विवाह आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मोना यांच्याबद्दलही भाष्य केलं. दरम्यान या ‘Ask Me Anything’ सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती इराणी प्रचंड संतापल्या. त्यांनी उगाच मोना यांची बदनामी करु नका सांगत आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली. 

एका चाहत्याने स्मृती इराणी यांनी तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं आहे का? असा प्रश्न विचारला. स्मृती इराणी यांनी चाहत्याचा हा प्रश्न थेट इन्स्टाग्रामला शेअर केला. स्मृती इराणी यांना अनेकदा या प्रश्नाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी झुबिन इराणी आणि मोना यांच्याशी नेमके कसे संबंध आहेत हे स्पष्ट केलं. 

स्मृती इराणी यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये प्रश्न आणि त्यावर दिलेलं उत्तर शेअर केलं आहे. मोना आपल्यापेक्षा वयाने 13 वर्षं मोठ्या असल्याने त्या लहानपणीच्या मैत्रीण असण्याचा काही संबंध नाही असं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं आहे. “नाही ओ, मोना माझ्यापेक्षा 13 वर्षं मोठ्या आहेत. त्यामुळे त्या लहानपणीच्या मैत्रीण असण्याचा प्रश्नच नाही,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे,

पुढे त्यांनी सांगितलं की, “ती (मोना) माझं कुटुंब आहे, राजकारणी नाही. त्यामुळे उगाच तिला यात ओढू नका. माझ्याशी भांडा, वाद घाला, बदनाम करा पण राजकारणाशी संबंध नसलेल्या नागरिकाला उगाच तुमच्यासह या गटारात ओढू नका. ती आदरास पात्र आहेत”.

स्मृती इराणी यांनी 2001 मध्ये झुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं जोहर आणि झोईश आहे. झुबिन यांचे स्मृती इराणी यांच्याआधी मोना यांच्याशी लग्न झालं होतं. झुबिन यांना पहिल्या लग्नापासून शेनेल नावाची एक मुलगी आहे.

दरम्यान प्रश्नोत्तराच्या या सेशनमध्ये स्मृती इराणी यांना तुम्हाला तुमचे टीव्ही अभिनयातील दिवस आठवतात का? असं विचारला. त्यावर त्यांनी उत्तर देत सांगितलं की, मी माझी इच्छा या भोवऱ्यात राहत नाही. ते दिवस जोपर्यंत होतो तेव्हा ते खूप छान होते. पुन्हा कधी होईल का? वेळच सांगेल. कारण आयुष्य हे कधीच नाही बोलू नये असं शिकवतं”.

Related posts