हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे.

इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13 नवजात मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सात नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोर्टात परिचारिकेला दोषी सिद्ध करण्यात भारतीय वंशाच्या डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मँचेस्टर क्राउन कोर्टातील न्यायाधिशांनी शुक्रवारी परिचारिका लुसी लेटबी (33) हिला सात नवजात बालकांची हत्या आणि इतर सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. सोमवारी मँचेस्टर क्राउन कोर्टात लुसी लेटबीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यानंतर इंग्लंडमधील चेस्टर शहरातील काउंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलचे भारतीय वंशाचे डॉक्टर रवी जयराम यांनी सांगितले की, माजी नर्स लुसी लेटबी यांच्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर पोलिस सतर्क झाले असते.

लुसीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून खटला सुरु आहे. मी बालकांची हत्या केली कारण मी वाईट आहे. त्यामुळेच त्यांची हत्या केली असे परिचारिकेचे म्हणणं होतं. त्या हल्ल्यांनंतर लेबीची मानसिकता दर्शविणाऱ्या अनेक नोट्स पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोर्टानं लुसीला दोषी ठरवलं आहे. 

भारतीय वंशाच्या डॉक्टरमुळे मिळाली शिक्षा

दुसरीकडे, इंग्लंडमधील चेस्टर येथील काउंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलमधील भारतीय वंशाचे डॉक्टर रवी जयराम यांनी सांगितले की, आरोपी परिचारिका लुसी लेटबीची वेळीच दखल घेतली गेली असती तर पोलिसांना तिला अडवता आलं असतं. निकालानंतर डॉ. रवी जयराम म्हणाले की, “2015 ते 2016 या कालावधीत लुसीने हे खून केले. तीन हत्या झाल्या, तेव्हा पहिल्यांदाच चिंता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात तज्ज्ञांसोबत अनेक बैठका झाल्या. शेवटी, एप्रिल 2017 मध्ये, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्टने डॉक्टरांना एका पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याची परवानगी दिली. आम्ही काय घडत होतं ते पोलिसांना सांगितलं. 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, पोलिसांच्या लक्षात आले की हे काहीतरी वेगळं आहे ज्याचा तपास करणे आवश्यक आहे. यानंतर तपास सुरू झाला आणि लुसीला अटक करण्यात आली.”

अशी करायची बालकांची हत्या

लुसी लेटबी मुलांना मारण्यासाठी त्यांच्या नसांमध्ये हवा आणि इन्सुलिन टोचत असत. याशिवाय मुलाला मारण्यासाठी ती जास्त प्रमाणात दूध आणि द्रव पदार्थ खाऊ घालायची. लुसी लेटबीवर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून खटला सुरू होता. तिने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. “मी त्यांना जाणूनबुजून मारले कारण मी त्यांची काळजी घेण्याइतकी चांगली नाही. मी वाईट आहे, मीच हे केले आहे. आज तुझा वाढदिवस आहे आणि तू इथे नाहीस आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटते,” असे लुसीने लिहिलेल्या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Related posts