( प्रगत भारत । pragatbharat.com)
Aliens : एकलियन्स हे काल्पनिक पात्र आहे की खरचं ते अस्तित्वात आहेत? याबाबत अद्याप कुणाही ठापणे काहीच सांगू शकलेले नाही. मात्र, अनेक जण एलियन्सला पाहिल्याचा दावा करतात. असाच एक अविश्वसनीय दावा करण्यात आला आहे. एलियन समुद्रावर अंघोळ करणाऱ्यांना लपून छपून पाहत होते. हे एलियन UFO हंटर कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे.
डेलीस्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. यूकेमधील डेव्हन बीचवर अनेक लोक सनबाथचा आनंद लुटत होते. यावेळीस अवकाशात एक रसहस्यमयी UFO दिसला. जॉन मुनेर नावाच्या UFO हंटरने आकाशात रसहस्यमयी UFO दिसल्याचा दावा केला आहे. या रसहस्यमयी UFO चे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले. रसहस्यमयी UFO चा फोटो कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर हे UFO काही क्षणात गायब झाल्याचा दावा देखील या UFO हंटरने केला आहे.
पृथ्वीवरील मानवावर UFO चा वॉच
पृथ्वीवरील मानवाच्या हालचलाचींवर रसहस्यमयी UFO वॉच ठेवत असल्याचा दावा या UFO हंटरने केला आहे. आकाशात अनेकदा अशा प्रकारच्या रसहस्यमयी UFO पाहल्याचा दावा या UFO हंटरने केला आहे.
अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा खळबळजनक दावा
अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं केलेल्या दाव्यानं खळबळ उडालीय. अमेरिकेच्या सरकारकडे एलियन्स आणि परग्रहावरील इतर जीवांचे मृतदेह असल्याचा खळबळजनक दावा या अधिका-यानं केलाय. डेविड ग्रुश असं या अधिका-याचं नाव आहे. अपघातग्रस्त यानातून हे मृतदेह सापडल्याचा दावाही डेव्हिड यांनी केलाय. वॉशिंग्नटमध्ये हाऊस ओव्हरनाईट सब कमिटीच्या सुनावणीवेळी त्यांनी हा दावा केलाय.
मानवावर एलियन्सचा हल्ला
7 फूट उंची, पिवळेधम्मक डोळे, अंगात हुडीसारखा वेश. हे एलियन्स चक्क माणसांवर हल्ला करू लागलेत..पेरू देशातल्या एका गावात एलियन्सनी हल्ला केल्याचं समजतंय. धक्कादायक बाब म्हणजे बचावासाठी एलियन्सवर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळ्यांचाही काहीच परिणाम झाला नाही. दोनवेळा एलियन्सवर फायरिंग करण्यात आली. मात्र एकही गोळी एलियन्सला लागली नाही. हवेतल्या हवेत एलियन्स गायब झाले, असा दावा स्थानिक गावक-यांनी केलाय. या प्रकारामुळं गावक-यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. दरम्यान, हा सगळा अंधश्रद्धेचा भाग असल्याचा दावा काहींनी केला. तर, सोने तस्करीशी संबंधित माफिया जाणीवपूर्वक घबराट पसरवत असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.