Rujuta Diwekar shared 6 Best Calcium Rich Foods which avaliable in just 10 Rs; आठवड्याभरात कॅल्शियम दुपटीने वाढवायचंय, ऋजुता दिवेकरने सांगितला भन्नाट ६ पदार्थांचा फॉर्म्युला, अवघ्या १० रुपयांत वाढवा Calcium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​दिवसाची सुरूवात करा या पदार्थाने

​दिवसाची सुरूवात करा या पदार्थाने

दिवसाची सुरूवात जर सुकामेवा, बियांनी केली तर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. लहान मुलांना किंवा अगदी तुम्ही देखील सकाळी प्रवासात ड्रायफ्रुट्स खाल्लेत तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आहारात अक्रोड, अंजीर, खजूर आणि जर्दाळू यासारख्या सुक्या फळांचा समावेश करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. त्यांच्यापासून आपल्या शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबी मिळते.

​चणे आणि शेंगदाणे​

​चणे आणि शेंगदाणे​

दोन कप चण्यामध्ये सुमारे 420 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. अगदी मधल्यावेळेत तुम्ही सुका खाऊ म्हणून चणे किंवा शेंगदाणे खाऊ शकता. चणामध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते यासोबतच यामध्ये कॅल्शियम देखील असते. छोट्या भुकेच्यावेळी तुम्ही चणे किंवा शेंगदाणे खाऊ शकता.

​​(वाचा – ब्रश केल्यानंतर पिवळ्या दातांचा थर कमी करण्यासाठी सकाळीच चावून खा हा पदार्थ, मोत्यासारखे चमकतील दात)

​कडधान्य

​कडधान्य

​बहुतेक कडधान्ये आणि शेंगा देखील कॅल्शियमने समृद्ध असतात. संपूर्ण कडधान्ये आणि शेंगा भारतीय पदार्थांमध्ये भरपूर असतात. मूग, मसूर, चना, राजमा या सर्वांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. हे केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर मेंदू आणि दातांनाही फायदा देतात.

​घरगुती पारंपरिक पदार्थ

​घरगुती पारंपरिक पदार्थ

कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही घरगुती पारंपरिक पदार्थांचा देखील समावेश करू शकता. अगदी छोले पुरी किंवा मिसळ पावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. ऋजुता सांगते की, पिझ्झा किंवा बर्गर अगदी घरी बनवून तुम्ही त्यामध्ये पारंपरिक आणि ऋतुनुसार फळांचा, भाज्यांचा समावेश करू शकता.

​(वाचा – टॉयलेटमध्ये बसल्यावर कळेल की, डॅमेज झालंय लिव्हर, विष्ठेशीसंबंधित या ५ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष )​

​दुग्धजन्य पदार्थ

​दुग्धजन्य पदार्थ

लहानांपासून अगदी ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच कॅल्शियमची आवश्यकता असते. तिशीनंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचाही आहारात समावेश करावा. दही, चीज, तूप यांचे सेवन शरीरासाठी चांगले असते. या सर्व गोष्टी शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतात आणि हाडे मजबूत ठेवतात.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts