Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं तर ते घर डोक्यावर घेतात.(trending news pilot flies american girl doll 5880 miles to 9 year old girl who lost it video viral on Internet )

लहान मुलींचं आवडतं खेळणं म्हणजे बाहुली. ही बाहुली त्यांची जीवाभावाची मैत्रिण असतं. अशाच एका 9 वर्षांच्या चिमुकलीची बाहुली प्लाइटमध्ये राहिली. उदास झालेल्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर पायलटने क्षणात हसू आणलं. 

सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रेंडिंग न्यूज आहे. झालं असं आहे की,  इंडोनेशियातील बालीमधून एक कुटुंब टेक्सासला परतत होतं. या प्रवासादरम्यान कुटुंबातील चिमुकलीकडे तिची आवडती बाहुली   होती. या प्रवासादरम्यान त्यांना टोकियो विमानतळावर थांबायचं होतं. त्यावेळी या चिमुकलीच्या हातातून बाहुली टोकियो विमानात राहिली. 

त्या चिमुकलीला तिची बाहुली परत हवी होती. तिने उदास झाली होती. तिच्या कुटुंबाने बाहुलीचे फोटो काढून सोशल मीडियावर हरवलेली बाहुली कोणाला दिसली तर परत करण्याचं आवाहन केलं. ही पोस्ट अमेरिकन एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या जेम्स डॅनेनला या हरवलेल्या बाहुलीबद्दल कळलं. व्हॅलेंटिना तिच्या बाहुलीसोबत टोकियोमधील विमानात शेवटची दिसली होती.

या पालयटने ठरवलं आपण ही बाहुली त्या चिमुकलीला द्यायची. यासाठी त्याने टोकियो ते टेक्सास हा सुमारे 6 हजार मैलाचा विमान प्रवास करुन बाहुलीच्या घरी तो आला. उदास झालेली चिमुकली जेव्हा ती बाहुली मिळाली त्याचा आनंदाचा पारा उतरला नाही. ती अख्खा घरात नाचत सुटली होती. जणू काही तिच्या श्वास तिला परत मिळाला होता. जवळपास तीन आठवड्यानंतर तिची जीवलग मैत्रीण आणि तिची भेट झाली होती. 

डॅनेने म्हणाला की, हा माझा स्वभाव असून मला लोकांना मदत करायला खूप आवडतं. एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करु शकलो, याचा मला खरोखर आनंद झाला. पायलटने त्या मुलीला जपानी पदार्थदेखील भेट म्हणून दिले. व्हॅलेंटिना, तिची बाहुली आणि पायलट यांची ही कहाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 

व्हॅलेंटिना एका शोमध्ये म्हणाली की, ही बाहुली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तीचं असणं मला आनंदी ठेवतं. ती माझी चांगली मैत्रीण आहे. जेव्हा आम्ही हॉटेलच्या दिशेने गेलो तेव्हा ती हरवली होती. मला खूप वाईट वाटलं आणि माझं हृदय तुटलं. 

कशी झाली व्हॅलेंटिना आणि बाहुलीची भेट! पाहा व्हिडीओ

व्हॅलेंटिनाच्या पालकांनी पायलट डॅनेनचे आभार मानले. तिचे वडील म्हणाले की, मला वाटत या जगात दयाळूपणा अजून आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. जेम्सने आमच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद परत आणला याबद्दल आम्ही आभारी आहोत. 

Related posts