पाकिस्तानात ‘भारत मिशन’ची जबाबदारी सांभाळणाऱ्या गीतिका श्रीवास्तव आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Geetika Srivastava India’s head of mission in Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये लहानसहान घडामोडीही चर्चेचा विषय ठरतात. एकिकडे पाकिस्तानमध्ये मोठं आर्थिक संकट आणि राजकीय उलथापालथ सुरु असतानाच भारतात मात्र वेगळं चित्र आहे. विविध मुद्दे देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत येत आहे. असं असतानाच देशातील सत्ताधारी पक्षानं सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवल्या आहेत. या साऱ्यामध्येच एक आश्चर्यकारक घटनाही घडली आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये ‘भारत मिशन’ मोहिमेची संपूर्ण जबाबदारी एका महिला अधिकाऱ्यांवर सोपवली जात आहे. 

गीतिका श्रीवास्तव असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव असून, त्या भारतातून पाकिस्तानाच रुजू होणाऱ्या पहिल्या महिला प्रभारी/ उपायुक्त असणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर भारत आणि पारिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव वाढला. ज्यानंतर एकंदर राजकीय पेच पाहता पाकिस्तानाच भारताचा कोणताही उच्चस्तरिय अधिकारी नियुक्त करण्यात आला नव्हता. त्यामुळं श्रीवास्तव यांची नियुक्ती सध्या नजरा वळवत आहे. 

कोण आहेत गीतिका श्रीवास्तव? 

भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2005 बॅचमधील गीतिका श्रीवास्तव सध्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये उप-सचिव म्हणून काम पाहतात. इथं त्यांच्याकडे इंडो पॅसिफिक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2007 ते 2009 दरम्यान श्रीवास्तव यांनी चीनमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावासातही काम पाहिलं होतं. याशिवाय कोलकाता येथील स्थानिक पारपत्र कार्यालयातही त्या सेवेत होत्या. इथं त्यांनी the Indian Ocean Region division च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 

 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच… 

या नियुक्तीची इतकी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्री प्रकाश यांना भारताचे उच्चस्तरिय आयुक्त म्हणून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं होतं. तेव्हापासून भारत सरकारचा चेहरा म्हणून पाकिस्तानात पुरुष राजदूतांना नियुक्त करण्यात आलं होतं. आतापर्यंत तिथं भारत मिशनसाठी जवळपास 22 प्रमुखांची नेमणूक करण्यात आली होती. इस्लामानाबादमध्ये या पदावर श्रीवास्तव यांच्याआधी अजय बिसरिया यांनी सेवा दिली होती. 

Related posts