banking news uday kotak resigns as md and ceo of kotak mahindra bank

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uday Kotak resigns Kotak Mahindra Bank : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता हे 31 डिसेंबरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. उदय कोटक (Uday Kotak) यांनी राजीनामा का दिला याबाबत बँकेने कोणतीही माहिती दिलेली नाही. बँकेच्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आली. कोटक महिंद्रा बँकेने उदय कोटक यांच्या राजीनाम्याची स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती दिली आहे. 

स्टॉक एक्सचेंज फायलिंगला दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या आज झालेल्या बैठकीत उदय कोटक यांचा राजीनामा स्विकारण्यात आला. . यानुसार उदय कोटक यांना 1 सप्टेंबर 2023 पासूनच व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावरुन मुक्त करण्यात आलं. बैठकीत झालेल्या ठरावानुसार दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत या दोनही जबाबदारी पार पाडतील. याासाठी आता आरबीआयच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. 

उदय कोटक यांनी ट्विट करत आपण राजीनाम दिल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, मी स्वेच्छेने दोनही पदावरुन पायउतार होत आहे. बँकेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाला उद्देशून त्यांनी राजीनामा पत्र देखील शेअर केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, या संपूर्ण प्रवासाचा एक भाग म्हणून मला आनंद झाला आहे. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.

बँकेच्या सीईओ पदावरुन राजीनामा दिला असला तरी उदय कोटक हे ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि महत्त्वपूर्ण शेअरहोल्डर’ म्हणून काम करत राहाणार आहेत. बँकेने त्यांच्या उत्तराधिकारीसाठी आवश्यक पावले उचलली आहेत आणि आरबीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे. 

उदय कोटक यांचा बँकेबरोबरचा सुरुवातीपासूनचा म्हणजे तब्बल 38 वर्षांपासूनचा प्रवास आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक म्हणून त्यांनी काम सुरु केलं. गेल्या अडतीस वर्षात कोटक महिंद्रा बँकेने बँकिंग क्षेत्रात एक महत्वाचं स्थान मिळवलं आहे. ही बँक विश्वास आणि सचोटीच्या जोरावर उभी आहे. आता पदाचा राजीनामा दिला असला तरी या संस्थेची देखभाल आणि विकास करण्यासाठी मी भागधारक म्हणून वचनबद्ध आहे, असं उदय कोटक यांनी म्हटलंय. 

उदय कोटक यांनी 1985 मध्ये एका नॉन बॅंकींग फायनान्स कंपनीच्या रुपात या संस्थेची सुरुवात केली. यात प्रगती करत बँक करर्शियल लँडर झाली. उदय कोटक यांची संपत्ती 13.4 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1.10 कोटी रुपये इतकी आहे. 

Related posts