रात्री भिजवून सकाळी प्या बडिशेप आणि खडिसाखरेचे पाणी, आरोग्याला मिळतील जादुई फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Badishep Ani Khadisakhar Pani: शरीरात उष्णता वाढल्यानंतर काय करावे असा जर प्रश्न असेल तर योग्य उपाय म्हणजे बडिशेप आणि खडिसाखरेचे पाणी पिणे. बडिशेप आणि खडिसाखरेचे मिश्रण हे आरोग्याला उपयोगी आणि फायदेशीर ठरते. केवळ शरीराला थंडावाच देत नाही तर पचनक्रियादेखील चांगली करण्यास मदत मिळते. बडिशेप आणि खडीसाखर या दोन पदार्थांचे मिश्रण शरीराचे तापमान संतुलनात ठेवण्यासाठी करता येते. त्यामुळेच सहसा जेवण झाल्यानंतरही याचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर केला जातो. बडिशेप आणि खडीसाखरच्या पाण्याचेही उत्तम फायदे आरोग्याला मिळतात. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबात अधिक माहिती दिली असून PharmEasy ने केलेल्या अभ्यासात याचे अनेक फायदे देण्यात आले आहेत, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts