( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Video : असं म्हणतात की वाईट कामाचे परिणामसुद्धा वाईटच होतात असे म्हणतात. कधीकधी तर वाईट कामं केली तर तिथल्या तिथे त्या कामाची शिक्षा देखील मिळाते. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये (Gujarat Crime) ट्रॅक्टर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासोबत घडला आहे. ट्रॅक्टर चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात हा ट्रॅक्टर चोरटा जबर जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक या चोरट्याच्या तब्येतीचं देखील कौतुक करत आहेत.
शोरूमच्या आवारात उभ्या केलेल्या ट्रॅक्टरची चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक ट्रॅक्टर सुरू होऊन तो चोरट्याच्या अंगावरुन गेला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ट्रॅक्टर अंगावरुन गेल्यानंतरही चोराला काहीच झाले नाही. ट्रॅक्टर पुढे जाताच ती व्यक्ती पुन्हा उभी राहिली. एवढेच नाही तर एवढे सगळं होऊनही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला.
ज्याच्यासाठी आला त्याला घेऊनच गेला
रात्रीच्या अंधारात हा चोरटा ट्रॅक्टर चोरण्यासाठी शोरूम बाहेर आला होता. जखमी झाल्यानंतरही त्याने त्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ट्रॅक्टर चोरी करताना त्याच्यासोबत असे काही घडले की लोकांनी तोंडात बोटं घातली आहेत. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीचा प्रयत्न करत असतानाच ट्रॅकर सुरु झाला आणि त्याचे मागचे चाक चोरट्याच्या अंगावरुन गेले. यामुळे चोरटा पूर्णपणे टायरखाली दबला गेला होता. मात्र अंगावरुन चाक गेल्यानंतरही चोरटा पुन्हा उभा राहिला आणि ज्याच्यासाठी तो तिथे आला होता ते काम करुन गेला.
टायरखाली दबला गेला चोरटा
गुजरातमधील अरावलीच्या मोडासा शहरातील हजीरा भागातील एका शोरुममध्ये हा सगळा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा रात्री ट्रॅक्टर चोरण्यासाठी शोरुमबाहेर आला होता. तो ट्रॅक्टरमध्ये काहीतरी करत असताना अचानक ट्रॅक्टर सुरू झाला. ट्रॅक्टर सुरू होताच तो पुढे सरकला आणि चोरट्याचा पाय टायरखाली दबला गेला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टरला तो थांबवू शकला नाही. काही क्षणात ट्रॅक्टरचे मागील चाक त्या चोराला चिरडत पुढे निघून गेले.
Viral Video | अपघातानंतरही चोरट्याने पळवला ट्रॅक्टर! गुजरातमधील प्रकार सोशल मीडियावर झाला व्हायरल#viralvideo #gujarat #accidentvideo #TruckDriver #Truck #accidentnews pic.twitter.com/PxeiVp16YB
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 11, 2023
पोलिसांना सापडला ट्रॅक्टर
ट्रॅक्टरच्या मागील टायरखाली येऊनही चोरट्याला कोणतीही दुखापत झाली नाही.चोर उठून लगेच त्याच ट्रॅक्टरवर बसला. त्यानंतर ट्रॅक्टरसह चोरट्याने तेथून पळून काढला. शोरूमचे मालक प्रल्हादभाई धनजीभाई पटेल यांनी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच एका गावातून ट्रॅक्टर जप्त केला. मात्र चोरटा अद्यापही सापडलेला नाही.