श्वास घेताना लागत होती धाप, तपासणी केली असता डॉक्टर हैराण, अखेर कापावी लागली जीभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. अनेकदा आपण एखादी छोटीशी समस्या किंवा आजार समजून दुर्लक्ष केलेली गोष्ट, फार गंभीर रुप धारण करते. असाचा काहीसा अनुभव 23 वर्षीय कॅटलिन एल्सॉप (Caitlin Alsop)  नावाच्या एका तरुणीला आला आहे. एक दिवस जेवताना श्वसनाचा त्रास झाला असता तिने डॉक्टरांकडे धाव घेतली होती. पण हा साधा आजार नव्हता. तरुणीची जीभ कापून टाकण्याची वेळ आली. 

एक दिवस घऱात जेवत असताना कॅटलिनला श्वास घेताना त्रास होत असल्याचं जाणवलं. यानंतर तिने धावतच डॉक्टरांना गाठलं. सुरुवातीला डॉक्टरांना कॅटलिनला गंभीर अॅलर्जीची रिअॅक्शन झाली आहे असं वाटलं. याला एनाफिलेक्सिस असं म्हणतात. डॉक्टरांचा विश्वास पटल्याने त्यांनी त्यावर उपचार सुरु केले. तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. पण प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. 

जीभ काळी पडली, सारखी बेशुद्ध पडू लागली

कॅटलिनने सांगितलं की, तिची जीभ सुजून काळी पडली होती. तिला असं वाटत होतं की आपली जीभ कापून टाकली आहे. ती वारंवार बेशुद्ध पडत होती. शेवटी एका डॉक्टरने तिला लुडविग एनजाइना झाला असावा अशी शंका व्यक्त केली. 

हा एक दुर्मिळ जीवाणूजन्य संसर्ग आहे जो तुमच्या मानेवर आणि तोंडाच्या खालील भागलाा प्रभावित करतो. अक्कलदाढ अडकल्याने हा त्रास होतो. कॅटलिनच्या बाबतीत, यामुळे सेप्सिस झाला. ज्यामुळे अवयव निकामी होतात किंवा ते प्राणघातक ठरू शकते.

जीभेचा एक भाग कापावा लागला

उपचार सुरू होताच, कॅटलिनचा ऑक्सिजन वाचवण्याच्या हेतून कोमात ठेवण्यात आलं. तर समस्या असलेला दात तसंच अक्कलदाढेतील दात बाहेर काढण्यात आला. सूज होऊ नये यासाठी गळ्यातील काही नस कापण्यात आल्या होत्या. कॅटलिन उठल्यानंतर तिला डॉक्टरांनी, तुझा जीव वाचवण्यासाठी जिभेचा भाग कापला गेला आहे आणि ती कधीही बोलू शकणार नाही अशी माहिती देण्यात आली. 

आजही वाटते संसर्गाची भीती

कॅटलिनने सांगितलं आहे की, मला आता बोबडं बोलावं लागत आहे. पण बोलणं शक्य होत आहे. आता मला पुन्हा एकदा व्यवस्थित बोलता यावं अशी इच्छा आहे. पण वेळीच ही समस्या घेरणाऱ्या डॉक्टरांचे मला आभार मानायचे आहेत. दरम्यान कोमाच गेल्याने कॅटलिनला आता जास्त गोष्टी लक्षात राहत नाहीत. ही तशी सामान्य बाब आहे. 

माझं ऑपरेशन होऊन चार वर्षं झाली आहेत. पण आजही मला छोट्या छोट्या संसर्गांची भीती वाटते. आपलं शरीर पुन्हा एकदा काम करणं बंद करेल अशी भीती तिला सतावते. पण सेप्सिसबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी ती मेहनत घेत आहे. 

Related posts