Indian Baby Girl and Boys Names on Goddess Hanuman or Hanuman Chalisa; ‘हनुमान चालीसा’वरून निवडा मुला-मुलींकरिता युनिक नावे

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Baby Names on Hanuman :  ज्या मुलाला आकाशातील तेजस्वी सूर्याचा गोळा चेंडूप्रमाणे भासला आणि त्याने थेट झेप घेऊन सूर्याचा गोळा हातात पकडला ते बाळ म्हणजे आपला मारूती किंवा हनुमान. प्रभू रामावर नितांत श्रद्धा करणारा हनुमान, आपल्या शेपटीला आग लावून  संपूर्ण लंका जाळून सितेचे प्राण वाचवणारा हनुमान… हनुमानाचे आपण असे असंख्य किस्से ऐकले आहेत. 

आपले बाळ देखील हनुमानासारखे ताकदवान आणि बलवान व्हावं असं वाटतं असेल. हनुमानांच्या या युनिक नावांचा विचार तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता. 

हनुमान चालीसामधील या नावांमधून निवडा मुला-मुलींची नावे

रुई – मारूतीरायाला जी पाने अर्पण केली जातात त्याला रुई असे संबोधतात. ही नाव मुलगा किंवा मुलगी दोन्हीसाठी निवडू शकता. 

सरोज – हनुमान चालीसामध्ये सरोज या नावाचा उल्लेख आहे. हे नाव देखील मुलगा किंवा मुलगी दोघांकरिता वापरू शकता. या नावाचा अर्थ आहे कमळ. 

मनु  – मनु हे देखील युनिसेक्स नाव आहे. याचा अर्थ ज्ञानी आणि पृथ्वीचा शासक असा आहे. 

 

रघुवर – रघुवर नावाचा अर्थ “भगवान हनुमान आणि भगवान रामाचा प्रिय” असा आहे. आपल्याला माहितच आहे प्रभू रामावर हनुमानाची किती श्रद्धा होती. हे श्रद्धेचं प्रतिक आहे. 

रामेष्ठ – हनुमान हा रामभक्त होता. त्यावरूनच रामेष्ठ या नावाचा उल्लेख आहे. रामाचा सर्वश्रेष्ठ भक्त. 

पिंगाक्ष – लाल डोळ्यांचा असा या नावाचा अर्थ आहे. हनुमना जितका शांत आहे तितकाच तो रागिष्ट देखील आहे. त्यामुळे हे नाव देखील मुलाला ठेऊ शकतो. 

 

रीतम – हनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा असा या नावाचा अर्थ आहे. 

रुद्राक्ष – शिवाचा अंश असा या नावाचा अर्थ आहे. 

शौर्य – न घाबरणारा, हनुमानासारखा शूर असा या नावाचा अर्थ आहे. 

प्रभवे – राजबिंडा, प्रसिद्ध आणि सुंदर असा या नावाचा अर्थ आहे. तसेच असा आशयाचा हनुमानाचा उल्लेख आहे. 

Related posts